अवनी वाघीण मृत्यूप्रकरणी वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; पुण्यातील प्राणीप्रेमींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 07:17 PM2018-11-11T19:17:31+5:302018-11-11T19:19:33+5:30
अवनी वाधिनीला ठार केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील प्राणीप्रेमी नागरिकांकडून माेर्चा काढण्यात अाला. यावेळी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची जाेरदार मागणी करण्यात अाली.
पुणे : अवनी वाघिणीच्या हत्येवरुन राज्यात राजकारण तापत असताना पुण्यातील प्राणीप्रेमींनी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली अाहे. पुण्यातील संभाजी बागेपासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत रविवारी सायंकाळी माेर्चा काढण्यात अाला हाेता. या माेर्चात माेठ्याप्रमाणावर तरुण सहभागी झाले हाेते.
अवनी वाघिनीला मारल्याप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंडीवार यांच्यावर विराेधी पक्षांकडून अाराेप केले जात अाहे. त्यात शिवसेनेने सुद्धा उडी घेतली असून अवनीच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन चाैकशीची मागणी करण्यात अाली अाहे. दरम्यान देशभरातून साेशल मिडीयाच्या माध्यमातून अवनीच्या हत्येविराेधात निषेध नाेंदविण्यात येत अाहे. अवनी वाघिनीला जिवंत न पकडता तिची हत्या केली असून याप्रकरणी वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच अवनीला गाेळी मारणाऱ्या शअाफत अली खान यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अाता प्राणीमित्रांकडून करण्यात येत अाहे. रविवारी संभाजी बागेपासून प्राणीमित्रांनी माेर्चा काढला. या माेर्चात अवनीचे छायाचित्र तसेच विविध मागण्यांचे फलक हातात धरण्यात अाले हाेते. तसेच अवनीची हत्या ही संशायास्पद असून सरकारला यवतमाळ येथील वनजमीन ही बिर्ला उद्याेग समूहाला द्यायची अाहे म्हणून अवनीला नरभक्षक ठरवून तिची हत्या केल्याचा अाराेप यावेळी करण्यात अाला. काळे वस्त्र परिधान केलेले शेकडाे तरुण या माेर्चात सहभागी झाले हाेते. यावेळी सरकारच्या विराेधात घाेषणा देण्यात अाल्या.
यावेळी बाेलताना प्राणीमित्र संघटनेचे ऋषीकेश कुलकर्णी म्हणाले, अवनीला पकडून तिचं पुनर्वसन करता अाले असते, परंतु तिला पकडण्याचे प्रयत्न न करात तिला गाेळी घालून ठार करण्यात अाले अाहे. कुठलेही नियम तिला गाेळी मारताना पाळण्यात अाले नाहीत. नियमाप्रमाणे रात्री 11 नंतर वाघीनीला बेशुद्ध करता येत नाही. तसेच माेहीमेच्या वेळी सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी साेबत असणे अावश्यक हाेते, परंतु तिला गाेळी मारण्यात अाली तेव्हा सरकारी पशुवैद्यकीय अधिकारी हजर नव्हता. गाेळी मारल्यानंतर बंदूक अाणि गाेळी जमा करण्यात अाली नाही. अशा अनेक नियमांचे उल्लंघन करण्यात अाले अाहे. अवनी वाघिनीचा सरकार, वनमंत्री अाणि उद्याेगपतींनी संगणमताने खुन केला अाहे. त्यामुळे वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच सरकारने याप्रकरणी याेग्य ताे खुलासा करावा.