पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 04:17 PM2023-01-21T16:17:20+5:302023-01-21T16:19:46+5:30

शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे...

Forest Minister Sudhir Mungantiwar said Students should also contribute to protect the environment | पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीही विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

googlenewsNext

पुणे : पवना शिक्षण संकुलातून वसुंधरेचे रक्षण करणारे, पवना परिसराला हिरवा शालू घालून पर्यावरणाचे संवर्धन करणारे विद्यार्थी घडावेत, असे प्रतिपादन राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पवनानगर येथील पवना शिक्षण संकुल येथे आयोजित वृक्षारोपण समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, पुणे महानगर प्रदेश विकास विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पवना प्रॉपर्टी असोसिएशनचे अध्यक्ष पद्मभूषण रजनीकांत श्रॉफ, पवना शिक्षण संकुलाचे सचिव संतोष खांडगे, प्राचार्य भाऊसाहेब आगळमे आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी देशाच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी जीवनात यश प्राप्तीसाठी प्रचंड मेहनत करावी आणि त्यासोबतच आई-वडिलांची सेवा करावी. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीदेखील विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे. शिक्षकांनीदेखील विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देणे गरजेचे आहे. 

कृषि महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी

मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना कृषि विषयाचे अद्यावत व तंत्रशुद्ध शिक्षण मिळावे यासाठी परिसरात कृषि महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कृषि महाविद्यालयासाठी लागणारी जागा जलसंपदा विभागाच्या अधिपत्याखाली असल्याने याबाबत राज्याच्या जलसंपदा मंत्र्याकडे याबाबत पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही मुनगंटीवार म्हणाले. मावळ परिसर डोंगरखोऱ्यात, निसर्गानी नटलेला परिसर असल्याचे यावेळी आमदार शेळके म्हणाले. परिसरात कृषि महाविद्यालयाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Forest Minister Sudhir Mungantiwar said Students should also contribute to protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.