स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येनंतरच्या घोषणेचा अजित पवारांना विसर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:20+5:302021-09-23T04:12:20+5:30
एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत म्हणून पुण्यातील युवक स्वप्निल लोेणकर याने आत्महत्या केली होती. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार ...
एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत म्हणून पुण्यातील युवक स्वप्निल लोेणकर याने आत्महत्या केली होती. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात लवकरच आयोगावरील सदस्य आणि विविध पदांच्या भरतीसंदर्भात घोषणा केली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, दोन महिन्यांनंतर प्रत्यक्षात काहीच हालचाली होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.
- शिवाजी इंगवले, विद्यार्थी
-----
कोट
कोरोनामुळे दीड-दोन वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन कोणत्याच परीक्षेची घोषणा केली नाही. त्यामुळे एमपीएससीची तयारी कशी करायची? असा प्रश्न पडला आहे. निश्चित वेळापत्रक नसल्याने अभ्यासावर परिणाम होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती. मात्र, त्याबाबत काहीच हालचाली होत नसल्याने विद्यार्थी निराश होत आहेत. राज्य शासनाने यासंदर्भात ठोस कार्यवाही करणे आपेक्षित आहे.
- अदिती भोसले, विद्यार्थी