कांस्य वाटी विसरा ; आता आले कांस्य मसाज यंत्र (व्हिडीओ)
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 06:59 PM2019-05-18T18:59:47+5:302019-05-18T19:00:42+5:30
उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यात कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून पुणेकर आता कांस्य मसाजचा अनुभव घेत आहेत.
पुणे : उष्णता दूर करणे, नेत्रविकार, त्वचारोग अशा आजारांसाठी हमखास वापरली जाणारी कांस्य वाटी (काशाची वाटी) आता नामशेष होत चालली आहे. हेच लक्षात घेऊन आता पुण्यात कांस्य यंत्र विकसित करण्यात आले असून पुणेकर आता कांस्य मसाजचा अनुभव घेत आहेत.
आयुर्वेदात कांस्य वाटीचे मोठे महत्व आहे. शरीरातील वात कमी करणे,थकवा कमी करून थंडावा निर्माण करणे, निद्रानाश होऊ नये अशा अनेक कारणांसाठी पादाभ्यंग केले जाते.यामुळे शरीराला एक प्रकारची तुकतुकी येऊन ताजेपणा आणि उत्साह जाणवतो. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही दुसऱ्या व्यक्तीसाठी वेळ नाही. अशावेळी दुसऱ्या व्यक्तीची मदत न घेता कांस्य थाळी यंत्रावर मसाज केला जात आहे. यात तिळाच्या किंवा खोबऱ्याच्या तेलाने आणि तुपाने वंगण करून मसाज केला जातो. साधारण दहा मिनिटांसाठी तीस रुपये इतका दर असून पुण्यात दहा ठिकाणी अशी केंद्र झाली आहेत. त्यांना पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेकजण एक वेगळा अनुभव म्हणून मसाज करून घेत आहेत.