आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर

By Admin | Published: October 7, 2014 06:58 AM2014-10-07T06:58:47+5:302014-10-07T06:58:47+5:30

मालमत्ता विद्रूपीकरण कायद्यानुसार खासगी, सरकारी जागेवरील राजकीय कार्यकर्त्यांचा उल्लेख असलेले छोटे-मोठे

Forget the implementation of Model Code of Conduct | आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा विसर

googlenewsNext

पुणे : मालमत्ता विद्रूपीकरण कायद्यानुसार खासगी, सरकारी जागेवरील राजकीय कार्यकर्त्यांचा उल्लेख असलेले छोटे-मोठे विनापरवाना नामफलक काढण्याची किंंवा ते झाकण्याची कार्यवाही शहरात सर्वत्र बारकाईने झालेली नाही. वाहनांवरही पक्ष चिन्हासह कार्यकर्त्यांची नावे झळकत आहेत. फ्लेक्स बोर्ड किंंवा बॅनरपुरती ही कारवाई मर्यादित राहिल्याने उमेदवाराच्या छबीसह अनेकांचे फलक सर्रास दिसून येत आहेत.
आचारसंहिता जाहीर होताच विनापरवाना फ्लेक्स बोर्ड किंंवा बॅनर एका रात्रीत काढले गेले. मात्र चौक, रस्ते, उद्याने, सार्वजनिक मंडळे या ठिकाणचे छोटे फलक कायम आहेत. नगरसेवक किंंवा काही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी आपापल्या भागांत चौकांमध्ये, गजबजलेल्या रस्त्यांवर नामफलक उभारले आहेत. महापालिकेने उभारलेल्या रस्तेदर्शक फलकांवर किंंवा अन्य ठिकाणच्या फलकांवर सौजन्य म्हणून नगरसेवकांची नावे झळकली आहेत. काही सार्वजनिक मंडळांनी त्यांच्या फलकांवर राजकीय नेत्यांची छायाचित्रे प्रदर्शित केली आहेत.
धायरी रस्त्यावरील एका भागात तसेच केळकर रस्त्यावर राजकीय कार्यकर्त्यांची छायाचित्रे असलेले फलक अद्याप काढले गेले नाहीत. त्यातील एकजण सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाना पेठ परिसर किंंवा मध्यवर्ती शहरात राजकीय कार्यकर्त्यांचे नाव प्रदर्शित होईल, असे छोटे फलक दिसून येतात.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडणूक कर्मचाऱ्यांनी असे फलक कागदांनी झाकून टाकले होते. आॅईलपेंटने नावे पुसून टाकण्याची दक्षता घेतली होती. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र या दक्षतेचा विसर पडल्याचे दिसून येते. राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांच्या मोटारींवर पक्षचिन्ह किंंवा स्वत:चे, नेत्याचे नाव झळकाविले आहे. तेही झाकून टाकणे किंंवा काढून टाकणे आवश्यक असताना मोटारींवरील मजकूर कायम असल्याचे दिसून येतो.

Web Title: Forget the implementation of Model Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.