भोर शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:17+5:302021-02-17T04:14:17+5:30
कोराेनामुळे अनेक उद्योगधंदे बंद असून शहरातील नागरिकांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्याची लोकांची अवस्था नसून भोर शहरातील ...
कोराेनामुळे अनेक उद्योगधंदे बंद असून शहरातील नागरिकांची अत्यंत वाईट अवस्था आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्याची लोकांची अवस्था नसून भोर शहरातील नागरिकांची घरपट्टी माफ करावी, अशी मागणी भोर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यधिकारी विजयकुमार थोरात व नगराध्यक्षा निर्मला आवारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
घरपट्टी माफ करण्याचे निवेदन माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी दिले मुख्यधिकारी थोरात यांना दिले. त्यावेळी
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुहित जाधव, प्रशांत जाधव, राजेश शिंदे, मयूर भिसे, धीरज चव्हाण, विजयराज नलावडे, किरण आंबिके, दानिश शेख, मयूर भालेराव, पांडुरंग आरावडे, विक्रम शिंदे, संतोष किंद्रे, गणेश भिलारे, मुन्ना बागवान, चेतन जाधव, मुस्तफा खान, ओंकार गायकवाड, अतिष वाडकर व नागरिक उपस्थित होते.
मुख्यधिकारी विजयकुमार थोरात यांना निवेदन देताना माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे व इतर.