महिला उमेदवाराच्या घरात शिरून गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:09 AM2021-01-17T04:09:51+5:302021-01-17T04:09:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मतदान संपल्यानंतर महिला उमेदवाराच्या घरात शिरून त्यांच्या अंगावर गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार कुडज गावात ...

A form of intimidation by throwing a gulal at a female candidate's house | महिला उमेदवाराच्या घरात शिरून गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार

महिला उमेदवाराच्या घरात शिरून गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मतदान संपल्यानंतर महिला उमेदवाराच्या घरात शिरून त्यांच्या अंगावर गुलाल टाकून धमकाविण्याचा प्रकार कुडज गावात घडला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सुमित राजेंद्र घुमे (वय २४) आणि मयंक कैलास कांबळे (वय २४, रा. कुडज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका २९ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कुडज गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीचे शुक्रवारी मतदान होते. फिर्यादी या तळजाई माता पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. मतदान संपल्यानंतर त्या घरी गेल्या. त्यांच्या विरोधी भैरवनाथ पॅनेलमधील दोघे जण रात्री उशिरा गुलालाचे पोते घेऊन जबरदस्तीने त्यांच्या घरात शिरले. त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न करून अंगावर गुलाल टाकला. विरोधात उभी राहतेस काय, तुला निकालाच्या दिवशी बघून घेतो, नाही खल्लास केले, तर बघ, अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A form of intimidation by throwing a gulal at a female candidate's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.