गुगल इमेजद्वारे प्रारूप वॉर्ड रचना
By admin | Published: April 25, 2015 05:11 AM2015-04-25T05:11:18+5:302015-04-25T05:11:18+5:30
महानगरपालिकेची २०१७ची निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार होणार असून, २०११च्या गुगल इमेजनुसार डिजिटलायजेशनद्वारे वॉर्ड रचना होणार आहे.
पिंपरी : महानगरपालिकेची २०१७ची निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीनुसार होणार असून, २०११च्या गुगल इमेजनुसार डिजिटलायजेशनद्वारे वॉर्ड रचना होणार आहे. एप्रिल महिना अखेरीस होणाऱ्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
महापालिकेची निवडणुकीची उत्सुकता शहरातील विविध राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते, इच्छुकांना लागली आहे. वॉर्डनुसार निवडणूक होणार असल्याने इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१२ची निवडणूक ही प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. २०१७ची निवडणूक वॉर्ड पद्धतीनुसार करण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने कामकाज सुरू केले आहे.
हस्तक्षेपावर नियंत्रण येणार
निवडणूक आयोगाने प्रभाग किंवा वॉर्डनुसार निवडणूक घेण्याचे जाहीर केल्यानंतर प्रारूप वार्ड रचना करतात. या कामासाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी विभागांचे नकाशे यानुसार वॉर्डांची सीमा निश्चिती करीत असतात. मात्र, नवीन वॉर्ड रचना ही डिजिटलायजेशनद्वारे होणार आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप होत असे. त्या राजकीय हस्तक्षेपावर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे हे काम आता गुगल इमेजद्वारे होणार आहे.
२०११च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १७ लाख २७ हजार २९२ एवढी आहे. त्यानुसार लोकसंख्येचे ३१०२ गट पाडण्यात आले होते. याच कालखंडातील गुगल इमेज
घेऊन परिसराचे गट पाडण्यात येणार आहेत. गटानुसार प्रारूप वॉर्ड
रचना तयार केली जाणार आहे. साधारणपणे तेरा ते पंधरा हजार लोकसंख्येचा एक वॉर्ड असेल.
पुन्हा वॉर्डनुसार रचना
२००२ची महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. त्या वेळी ३५ प्रभाग होते. त्यानंतर २००६च्या निवडणुकीत १०५ वॉर्ड होते. त्यानंतर २०१२ची निवडणूक प्रभाग रचनेनुसार झाली होती. ६४ प्रभागांत १२८ वॉर्डांचा समावेश होता.
आॅनलाईन नामनिर्देशन पत्र
निवडणुकीसंदर्भातील कामकाज तीन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात प्रारूप वॉर्ड रचना,
दुसऱ्या टप्प्यात गटानुसार कुटुंब
जोड, तिसऱ्या टप्प्यात वॉर्ड
रचनेचे संगणकीकरण होणार
आहे. निवडणूक प्रक्रियेत
संगणकाचा वापर केला जाणार आहे. नामनिर्देशन पत्र स्वीकृती, विविध प्रकारची कागदपत्रे आॅनलाईन सादर करावी लागणार आहेत. वॉर्ड रचनेनुसार एप्रिलअखेर संगणक विभागांतील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. (प्रतिनिधी)