शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 05:02 PM2024-12-01T17:02:32+5:302024-12-01T17:03:21+5:30

हल्लेखोर यांची नावे व संख्या निष्पन्न झाली असून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती समोर आली आहे 

Former deputy sarpanch of Shikrapur Dattatray Gilbile was killed | शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या

शिक्रापूर : शिक्रापूरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची धारदार हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या घराजवळ घडली. 

दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. दरम्यान घटनेनंतर त्यांना तात्काळ पुणे येथे खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. गिलबिले यांच्या हत्तेची बातमी समजताच शिक्रापूरमध्ये एकच खळबळ उडाली. मालमत्ता अथवा इतर कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. हल्लेखोर यांची नावे व संख्या निष्पन्न झाली असून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी दिली. दरम्यान शिक्रापूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहॆ.

Web Title: Former deputy sarpanch of Shikrapur Dattatray Gilbile was killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.