माजी उपसभापतींच्या रायरेश्वर पॅनलचे पाच जागांवर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:11 AM2021-01-25T04:11:17+5:302021-01-25T04:11:17+5:30

यवत: सहजपुर (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निकालात दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांच्या पॅनलला बहुमत मिळू शकले ...

Former Deputy Speaker's Rayareshwar Panel satisfied with five seats | माजी उपसभापतींच्या रायरेश्वर पॅनलचे पाच जागांवर समाधान

माजी उपसभापतींच्या रायरेश्वर पॅनलचे पाच जागांवर समाधान

Next

यवत: सहजपुर (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निकालात दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांच्या पॅनलला बहुमत मिळू शकले नाही. यामुळे ११ पैकी ६ जागांवर विरोधक आघाड्या तर ५ जागांवर दरेकर यांच्या रायरेश्वर पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे सरपंच नक्की कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

११ जागा असलेल्या सहजपुर ग्रामपंचायतीची निवडणूक मोठ्या चुरशीने लढवली गेली.दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर यांनी सर्व ११ जागांवर रायरेश्वर पॅनल उभे करत नवीन उमेदवारांना संधी दिली होती.तर जय मल्हार विकास पॅनल व जनसेवा पॅनलने देखील त्यांचे उमेदवार उभे केले होते.याचबरोबरीने आठ अपक्ष देखील निवडणूक रिंगणात होते.

११ पैकी ५ जागा मिळविण्यात रायरेश्वर पॅनलला ५ जागा मिळाल्या तर बापूसाहेब मेहेर यांच्या नेतृत्वाखालील जय मल्हार विकास पॅनलने अटीतटीच्या लढतीत वार्ड क्रमांक एक मधील तीनही जागा पटकावल्या.

माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने तीन जागांवर विजय मिळविला.यामुळे आता सहजपुर ग्रामपंचायतीवर सरपंच कोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सरपंच पदाच्या आरक्षण सोडत नंतर कोणाचा कोणाला पाठींबा मिळणार आणि कोण सरपंच पदाच्या माध्यमातून सत्ता चालविणार याची समीकरणे ठरणार आहेत.

विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :

रायरेश्वर पॅनल :- काजल विशाल म्हेत्रे , अर्चना विठ्ठल म्हेत्रे , सारिका सुशील कांबळे , स्वाती अविनाश होले व बापू दगडू थोरात

जय मल्हार पॅनेल :-सविता बापूसाहेब मेहेर , प्रियांका राजेंद्र माकर व सीताराम पोपट वेताळ

जनसेवा पॅनल :- रोहित म्हेत्रे , मीना चांगदेव म्हेत्रे व बंडू गायकवाड

उपसभापती दरेकर यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार

सहजपुर ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक १ हा पंचायत समिती उपसभापती सुशांत दरेकर यांचा बालेकिल्ला होता. मात्र बापूसाहेब मेहेर, माजी सरपंच सिद्धार्थ गजधने , सागर माकर , छबन माकर , भाऊ माकर , लीला माकर , राजू पांगारकर , संतोष गायकवाड , भाऊ कोकाटे , पोपट म्हेत्रे , महेश म्हेत्रे ,पोपट विधाते , कुमार म्हेत्रे यांनी जय मल्हार पॅनल उभा करून त्यांचे तीनही उमेदवार या वार्डात निवडून आणत बालेकिल्ल्याला खिंडार पाडले.

२३ यवत सहजपुर

सहजपुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय मल्हार पॅनेलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार करताना मान्यवर

Web Title: Former Deputy Speaker's Rayareshwar Panel satisfied with five seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.