माजी नगराध्यक्षांच्या आई-वडीलांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:10 AM2021-04-28T04:10:16+5:302021-04-28T04:10:16+5:30

बारामती : बारामती शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. शहरात अनेकांचे कोरोनामुळे ...

Of the former mayor's parents | माजी नगराध्यक्षांच्या आई-वडीलांचे

माजी नगराध्यक्षांच्या आई-वडीलांचे

Next

बारामती : बारामती शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. शहरात अनेकांचे कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यातच बारामतीच्या माजी नगराध्यक्षांच्या आई वडीलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. काही तासांच्या अंतराने एकाच दिवशी दोघांचा मृत्यु झाला आहे.

माजी नगराध्यक्षा संध्या बोबडे या बारामतीच्या प्रथम नगराध्यक्षा आहेत. बोबडे यांचे आई-वडील एकाच दिवशी कोरोनाने हिरावून नेले आहेत. त्यामुळे बोबडे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

रविवारी (दि. २५) संध्या बोबडे यांचे व़डील शांताराम शिंदे (वय ८९ ) व आई पुष्पावती शिंदे (वय ८०) यांचे अगदी काही तासांच्या अंतराने निधन झाले. दोन आठवड्यांपूर्वी पुण्यातून थोड अंग दुखतय म्हणून विश्रांती साठी संध्या बोबडे यांच्याकडे ते आले होते. दवाखान्यात नेल्यानंतर दोघांच्याही तपासण्या करुन घेण्याचे डॉ. सतीश बोबडे यांनी ठरविले. ते कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु झाले. बारामतीतीलच एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. काही काळ त्यांनी उपचाराला साथही दिली. परंतु रविवारी मात्र प्रारंभी शांताराम शिंदे यांची प्रकृती खालावली व त्यांची प्राणज्योत मालविली. काही तासातच पुष्पावती यांनीही आपला प्राण सोडला. मात्र, पतीचे निधन झाल्याचे पुष्पावती यांना कोणीही सांगितलेले नव्हते, त्यांची तब्येत थोडी चिंताजनक असल्याचेच त्यांना सांगितले गेले.

शांताराम शिंदे माती परिक्षण अधिकारी होते, नोकरीच्या निमित्ताने राज्यातील विविध शहरात त्यांनी काम केलेले होते.

फोटो : शांताराम शिंदे, पुष्पावती शिंदे

२७०४२०२१ बारामती—०४

Web Title: Of the former mayor's parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.