माजी मंत्री पाटील तयारीत, राज्यमंत्री भरणेंचे अलिप्त धोरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:12 AM2021-09-19T04:12:30+5:302021-09-19T04:12:30+5:30

सतीश सांगळे लोकमत न्यूज नेटवर्क कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसांमध्ये ...

Former Minister Patil ready, aloof policy to fill the Minister of State? | माजी मंत्री पाटील तयारीत, राज्यमंत्री भरणेंचे अलिप्त धोरण?

माजी मंत्री पाटील तयारीत, राज्यमंत्री भरणेंचे अलिप्त धोरण?

Next

सतीश सांगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

कळस : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या कारखान्यावर भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कायम एकहाती सत्ता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या कारखान्याच्या राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहण्याचे धोरण पसंत ठेवले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामसूम राहिल्यास हा कारखाना भाजपला आदंणच मिळणार आहे.

तालुक्यातील या साखर कारखान्याची गाळपक्षमता मोठी आहे. सहवीजनिर्मिती, आसवानी, व इथेनाॅल प्रकल्प असूनही आर्थिक नियोजन कोलमडून पडले आहे. हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या कायम ताब्यात आहे. उपपदार्थ निर्मिती असलेला हा साखर कारखाना माजी खासदार कै. शंकरराव पाटील यांनी वालचंदनगर येथील जुना कारखाना विकत घेऊन बिजवडी येथील माळरानावर ३५ वर्षांपूर्वी सुरू केला. कारखान्याच्या स्थापनेपासून पाटील घराण्याकडे निर्विवाद सत्ता आहे. अनेकवेळा निवडणूक झाली. कधी काही जागा बिनविरोध झाल्या. मात्र,सत्ता कायम पाटील घराण्यात राहिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पतित पावन संघटनेत असताना त्यांनी १९९४ व ९९ ला सत्ताधारी पाटील गटाच्या विरोधात पॅनल तयार करून आव्हान दिले. नंतरच्या काळात २००५ व १० साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दिग्गज नेते मंडळी उभी राहिली. मात्र, माजी मंत्री पाटील यांनी एकहाती सत्ता कायम ठेवली. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी चक्र फिरवल्यामुळे तालुका नेत्यांनीही दुर्लक्ष केल्याने स्थानिक पातळीवर पॅनल उभी करण्यात अपयश आले. पाटील गटाच्या काही जागा बिनविरोध होऊन पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले.

यासहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात होता. मात्र निवडणुकीवरील स्थगिती दिल्याने नामनिर्देशन पत्र दोन दिवसच भरण्यात आले. आता स्थगिती संपल्याने २० सप्टेंबरनंतर निवडणूक पहिल्या टप्प्यातच होणार आहे. आहे त्याच टप्प्यावर निवडणूक सुरू होणार असल्याने लवकरच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.

चौकट

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात कळस पळसदेव, भिगवण, निमगाव-केतकी हे जिल्हा परिषदेचे गट येतात यामध्ये निमगाव-केतकी वगळता सर्व गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र, सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी ऊसदर व कारखान्याच्या निगडीत प्रश्नांची कधीही राष्ट्रवादी काँग्रेसने पोलखोल केली नाही मात्तबर नेत्यांनी आपला ऊस खासगी कारखान्यांना देऊन या सहकारी तत्वावरील कारखान्याकडे दुर्लक्ष केले.

फोटो,

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील फोटो वापरणे

Web Title: Former Minister Patil ready, aloof policy to fill the Minister of State?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.