उत्तर प्रदेशात सामुहिक बलात्कार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 08:04 PM2022-07-25T20:04:19+5:302022-07-25T20:04:25+5:30

एक लाख रुपयांचे बक्षीस होते नावावर

former mla son arrested from Pune in Uttar Pradesh gang rape case | उत्तर प्रदेशात सामुहिक बलात्कार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक

उत्तर प्रदेशात सामुहिक बलात्कार प्रकरणी माजी आमदाराच्या मुलाला पुण्यातून अटक

googlenewsNext

पुणे : उत्तर प्रदेशात एका तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलाला वाराणसी तसेच हडपसर पोलिसांनी अटक केली. आरोपी हडपसर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत राहायला होता. पसार झालेल्या आरोपीची माहिती कळविणाऱ्यास उत्तरप्रदेश पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

विष्णू विजय मिश्रा (वय ३४, रा. भदाई, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विष्णु मिश्रा याचे वडील विजय मिश्रा हे उत्तरप्रदेशातील भदोईचे आमदार होते. सामुहिक बलात्कार प्रकरणात सहभाग मिश्रा सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर तो पसार झाला होता. उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता तपासा दरम्यान मिश्राचे नातेवाईक पुण्यात राहत असल्याची माहिती विशेष तपास पथकाला मिळाली होती. दहा दिवसांपुर्वी उत्तर प्रदेश पोलीसांचे पथक पुण्यात दाखल झाले.

त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने मिश्रा याला अटक केली. त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) दिली. त्यानंतर त्याला घेऊन पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात रवाना झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, निखील पवार, भगवान हंबर्डे, सोनवणे तसेच वाराणसी पोलिसांच्या विशेष पथकातील सहायक आयुक्त शैलेश सिंग, पोलीस निरीक्षक श्रीवास्तव, उपनिरीक्षक अंगद यादव, हवालदार राहुल सिंग यांनी ही कारवाई केली.

Web Title: former mla son arrested from Pune in Uttar Pradesh gang rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.