माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेेक्सिकाे सरकारचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 09:03 PM2019-05-31T21:03:47+5:302019-05-31T21:04:57+5:30
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुणे : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून नावलाैकिक मिळवलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना मेक्सिकाे सरकारचा प्रतिष्ठेचा ‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवारी (1 जून) राेजी पुण्यात ताे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
‘ऑर्डन मेक्सिकाना डी अॅग्यूइला ऍझटेका’ हा पुरस्कार मेक्सिको देशाशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणा-या परदेशी नागरिकाला प्रदान करण्यात येतो. उद्या हा पुरस्कार प्रदान साेहळा सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ काॅमर्स इंडस्ट्रीजच्या पाचव्या मजल्यावरील सभागृहात सकाळी 11.30 वाजता हाेणार आहे. मेक्सिकाेच्या राजदूत या साेहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. मेक्सिकाे देशाशी मानवतावादी परस्पर संबंध दृढ करणाऱ्या परदेशी नागरिकाला हा सन्मान प्रदान करण्यात येताे. यापूर्वी डॉ. नेल्सन मंडेला, राणी एलिझाबेथ (द्वितीय), डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, बिल गेट्स या मान्यवरांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
देशाच्या राष्ट्रपती असतांना सन 2007 मध्ये मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष फेलिपी डी जेझस कॉल्डेरॉन हिनोजोसा यांनी भारताला भेट दिली होती. त्यांच्या निमंत्रणावरुन पाटील यांनी 2008 मध्ये मेक्सिकोला भेट दिली होती. या काळात दोन्ही देशांदरम्यान असलेले संबंध अधिक बळकट झाले होते.