माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 11:36 AM2023-02-24T11:36:26+5:302023-02-24T11:36:45+5:30
प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज पुण्यात निधन झाले.
शेखावत यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आला होता. यामुळे त्यांना पुण्यातील केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होतील.
प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांनी इ.स. २००७ ते इ.स. २०१२ मध्ये राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रतिभा पाटील यांचा १९६५ मध्ये डॉ. देवीसिंग शेखावत यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
शेखावत यांना 1972 मध्ये मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. शेखावत हे विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अमरावतीचे माजी महापौर (1991-1992) होते. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेतील अमरावती मतदारसंघातून 1985-1990 या कालावधीसाठी निवडून आले होते. 1995 च्या लढतीत त्यांनी त्यांची अनामत गमावली होती.
अमरावतीचे प्रथम महापौर डॉ. देवीसिंह शेखावत
- डॉ. देवीसिंह शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे यजमान होत.
- अमरावती महापालिकेचे प्रथम महापौर १९९२ साली
- अमरावती विधानसभा मतदार संघाचे आमदार १९८५ ते १९९०
- अमरावती येथील विद्याभारती शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष
- अमरावती शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष १९९० ते १९९४
- श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या सेलुबाजार येथील महाविद्यालयात डॉ. देवीसिंह शेखावत यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली.