Rajni Tribhuvan: पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे हृदयिकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 12:51 IST2024-05-15T12:50:12+5:302024-05-15T12:51:03+5:30
रजनी रवींद्र त्रिभुवन या पुणे महापालिकेच्या माजी महापौर होत्या....

Rajni Tribhuvan: पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे हृदयिकाराच्या झटक्याने निधन
पुणे :पुणे शहराच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन (Rajani tribhuvan passed away) यांचे आज बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भावाच्या निधनानंतर त्यांच्या अंतदर्शनासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी अत्यंत भावनिक झाल्याने त्या रडल्या होत्या. त्यानंतर रजनी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
रजनी रवींद्र त्रिभुवन या पुणे महापालिकेच्या माजी महापौर होत्या. 2004 ते 2006 यादरम्यान त्यांनी शहराचे महापौर पद भूषवले. त्यावेळी त्यांनी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच नागरिकांच्या विविध प्रश्न सोडवत, शहरातील पायाभूत सुविधांकडेही लक्ष दिले होते.