माजी सरपंच जयदीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:54+5:302021-08-19T04:14:54+5:30

मोक्का न्यायालयाने तात्पुरत्या जामिनाची मुदत वाढवली माळेगाव : मोक्का न्यायालयाने माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना हायकोर्टात अपील ...

Former Sarpanch Jaideep | माजी सरपंच जयदीप

माजी सरपंच जयदीप

Next

मोक्का न्यायालयाने तात्पुरत्या

जामिनाची मुदत वाढवली

माळेगाव : मोक्का न्यायालयाने माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना हायकोर्टात अपील करण्यासाठी व तात्पुरत्या जामिनाची मुदत चार आठवडे वाढवली आहे. त्यामुळे तावरे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांनी दिलेल्या जबाबावरून त्यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात चिथावणी दिली, म्हणून माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. जयदीप तावरे यांच्या समर्थनार्थ गाव बंद व निषेधसभा पार पडली. यानंतर २३ दिवसांनंतर जयदीप तावरे यांना मोक्का न्यायालयात तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला.

या प्रकरणात तपासाअंती त्यांचा काहीही संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मोक्का न्यायालयात न्या. अग्रवाल कोर्टात अहवाल सादर केला. या अहवालावर न्या. अग्रवाल यांनी दि. १६ आॅगस्ट रोजी सुनावणी करताना जामीन तात्पुरता रद्द करावा व पोलिसांनी कलम १६९ अन्वये दिलेला अहवाल चार्टशीट दाखल करताना सादर करावा व जयदीप तावरे यांनी १८ तारखेस न्यायालयात शरण यावे असा निर्णय दिला.

या निर्णयावर जयदीप तावरे यांचे वकील अॅड. हर्षद निंबाळकर, अॅड.प्रसाद गावडे, अॅड. धैर्यशील जगताप यांनी जोरदार युक्तिवाद करुन सदर निर्णयाविरोधात हायकोर्टात अपिल करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत द्यावी व तेवढाच कालावधी हजर राहण्यासाठी द्यावा, अशी मागणी केली.

या मागणीचा विचार करून न्या.अग्रवाल यांनी जयदीप तावरे यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद मान्य करत अपिल करण्यासाठी व हजर राहण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी दिला आहे. या निर्णयामुळे जयदीप तावरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Former Sarpanch Jaideep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.