वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 02:56 PM2022-04-30T14:56:51+5:302022-04-30T14:57:24+5:30

ग्रामसभेदरम्यान  सरपंचांना प्रोसेडिंग बुक व घरकुल यादी बाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी पूर्व नियोजनातून फिर्यादीवर  काठ्या व शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

Former Sarpanch of Vegare Bhau Margale was assassinated by the current Sarpanch | वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला

वेगरेचे माजी सरपंच भाऊ मरगळे यांच्यावर विद्यमान सरपंचांकडून खूनी हल्ला

Next

पौड :

मौजे वेगरे येथील जि. प.शाळेत ग्रामसभा चालु असताना  मागील ग्रामसभेचे वृत्त ,प्रोसिडींग व घरकुल यादी बाबत विचारणा केली असल्याच्या कारणावरून विद्यमान सरपंच मीनाथ कानगुडे  व त्याचे तीन चार साथीदार यांनी माजी सरपंच भाऊ पांडुरंग मरगळे यांच्यावर खुनी हल्ला केला. सदर घटना ता. २९ रोजी वेगरे येथे ग्रामसभेदरम्यान दररम्यान घडली असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली.

याबाबत फिर्यादी भाऊ मरगळे याने पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर यातील मुख्य आरोपी मिनाथ मारूती कानगुडे वय 37 वर्ष व अभिषेक दत्तात्रय कानगुडे वय 21 वर्ष दोन्ही रा. वेगरे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांना पौड पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य साथीदार फरारी आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ग्रामसभेदरम्यान  सरपंचांना प्रोसेडिंग बुक व घरकुल यादी बाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपींनी पूर्व नियोजनातून फिर्यादीवर  काठ्या व शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यात भाऊ मरगळे गंभीर जखमी झाले. जखमीवर पिरंगुट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाऊ मरगळे यांच्या चारचाकी गाडीचीही नासधूस आरोपींनी केली आहे.

आरोपी  मिनाथ मारूती कानगुडे, अभिषेक दत्तात्रय कानगुडे  यांना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी मुन्ना पोळेकर  रा.वेगरे ता मुळशी जि पुणे व  मिनाथ कानगुडे यांचा साथीदार नाव पत्ता नाहीत नाही  हे फरारी आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव हे करीत आहेत.

Web Title: Former Sarpanch of Vegare Bhau Margale was assassinated by the current Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.