स्त्री आदीशक्तीचे रूप : तनाज दोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:03+5:302021-03-10T04:11:03+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त वालचंदनगर येथील गेस्ट हाऊसच्या परिसरात वालचंदनगर कंपनी व आय एम डी कामगार समन्वय संघ ...
जागतिक महिला दिनानिमित्त वालचंदनगर येथील गेस्ट हाऊसच्या परिसरात वालचंदनगर कंपनी व आय एम डी कामगार समन्वय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन उत्साहमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालय भारत चिल्ड्रेन्स अकॅडमी व कंपनी मधील महिलांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत महिला दिन साजरा केला. यावेळी मार्गदर्शन करताना महिला व बालविकास अधिकारी प्रियांका गवळी यांनी सांगितले की "आजच्या स्त्रीने चूल आणि मूल या परंपरेत अडकून न राहता स्वत: कर्तृत्वाने पदवी प्राप्त केली पाहिजे आजची स्त्री राजकारणात क्रीडा क्षेत्रात उद्योग व्यवसायात विविध ठिकाणी अधिकारी पदाची जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसत आहे ही अत्यंत गौरवाची बाब आहे.तर स्त्रियांनी समाजात वावरताना भीती आणि दडपण न घेता आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी व यशस्वी जीवन जगावे असे मत अॅड. सुप्रिया बर्गे यांनी व्यक्त केले. यावेळी कोरणा काळात काम केलेल्या वैशाली शिवशरण, ज्योती मिसाळ, नाझिया शेख यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सारिका गांधी यांनी केले. उपस्थित महिलांना आय एम डी कामगार समन्वय संघाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. यावेळी कामगार समन्वय संघाचे जिल्हा सचिव प्रवीण बल्लाळ मुरलीधर चिंचकर राहुल रणमोडे, दत्तात्रय खताळ, सचिन कोळी, संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
वालचंद नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कोरोना योद्धा महिलांचा सन्मान करण्यात आला.
०९०३२०२१-बारामती-०२
-------------------------