दुर्ग संवर्धन टीमने वाचविले अनेक कोरोनाबाधितांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:22+5:302021-05-16T04:11:22+5:30

हिवरे (ता. शिरूर) येथील संदेश सतीश साळुंके व त्यांच्या दुर्ग संवर्धन टीमने करोना काळात रुग्णांची मदतीची चळवळच उभी ...

The fort conservation team saved the lives of many corona victims | दुर्ग संवर्धन टीमने वाचविले अनेक कोरोनाबाधितांचे प्राण

दुर्ग संवर्धन टीमने वाचविले अनेक कोरोनाबाधितांचे प्राण

Next

हिवरे (ता. शिरूर) येथील संदेश सतीश साळुंके व त्यांच्या दुर्ग संवर्धन टीमने करोना काळात रुग्णांची मदतीची चळवळच उभी केली आहे. समाजासाठी मोठे काम उभे करत संदेशने दुर्ग संवर्धन आणि करत असलेल्या भटकंतीतून जोडत गेलेली माणसे एकत्र केली आणि राज्यात एक जाळं निर्माण केले. त्याने या माध्यमाचा उपयोग जनकल्याणासाठी वापरायचे ठवरले व कामाची व्याप्ती वाढत गेली. तालुक्यात कुठेही प्लाझ्माची गरज भासली, तर दुर्ग संवर्धन टीमला लोकांना आश्वासक वाटते आहे व त्यांचे फोन खणखणले जातात. या उपक्रमाबरोबरच गरीब व भुकेल्या,रस्त्याने भटकत असलेल्या लोकांसाठी जेवण पुरवण्याची सोय त्याच्या टीमने सुरू केली आहे.

त्याच्या याच कार्याची दखल घेत राष्ट्रीय जनकल्याण सेवा समितीने पुणे जिल्ह्याचा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार त्याच्या हाती सोपवला आहे. गेल्या आठवड्यात भरवण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६३० पेक्षा जास्त तरुण युवकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे ह्या टीम मधील सदस्य संपूर्ण जिल्ह्यात आपापल्या भागत हा उपक्रम राबवत आहे.

--

Web Title: The fort conservation team saved the lives of many corona victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.