किल्ले पुरंदर व परिसरातील स्मृतीस्थळ पर्यटन म्हणून विकसित होणार -आमदार संजय जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:20+5:302021-09-09T04:15:20+5:30

सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ...

Fort Purandar and surrounding memorials will be developed as tourism - MLA Sanjay Jagtap | किल्ले पुरंदर व परिसरातील स्मृतीस्थळ पर्यटन म्हणून विकसित होणार -आमदार संजय जगताप

किल्ले पुरंदर व परिसरातील स्मृतीस्थळ पर्यटन म्हणून विकसित होणार -आमदार संजय जगताप

googlenewsNext

सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून किल्ले विकास व किल्ले पायथा व ५० किलोमीटर परिसरातील पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे जाहीर केले असून, यामध्ये पुरंदर किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी केली. यावेळी त्यांनी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची घोषणाही केली.

भिवडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्यावतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३० व्या शासकीय जयंतीनिमित्त स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, तहसीलदार रुपाली सरनोबत, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, उमाजी नाईक यांचे वंशज रमण खोमणे आणि चंद्रकांत खोमणे, मोहन नाना मदने, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच राहुल मोकाशी, रामदास धनवटे, विठ्ठल मोकाशी, साहेबराव जाधव, भैया खोमणे, बाळासाहेब भिंताडे, साधू दिघे, दिलीप वांढेकर, त्याच प्रमाणे राज्याच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, परिसरातील सर्व गावांचा कायापालट होणार असून, या गावांचा इतिहास जतन केले जाणार आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जन्मस्थाने एकाच परिसरात असल्याने या स्मृतीस्थळांचा विकास पर्यटन म्हणून केला जाणार आहे. असे सांगतानाच उमाजी नाईक यांचे समाधी स्थान नगरपालिकेने विकसित करण्याचे जाहीर केले आहे. त्याच प्रमाणे स्मारकाच्या विकासासाठी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची घोषणा करून त्यातून त्यांचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून समाजासमोर आणला जाईल.

--

फोटो क्रमांक : ०८सासवड किल्ले पुरंदर स्मृतीस्थळ

फोटो ओळ ; भिवडी ( ता. पुरंदर ) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित ग्रामस्थ.

080921\img-20210907-wa0017.jpg

फोटो ओळ ; भिवडी ( ता. पुरंदर ) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.

Web Title: Fort Purandar and surrounding memorials will be developed as tourism - MLA Sanjay Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.