किल्ले पुरंदर परिसर स्मृतिस्थळ विकसित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:29+5:302021-09-09T04:15:29+5:30
सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील ...
सासवड : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून किल्ले विकास व किल्ले पायथा व ५० किलोमीटर परिसरातील पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये पुरंदर किल्ल्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व गावांचा कायापालट होणार असून, या गावांचा इतिहास जतन केला जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जन्मस्थाने एकाच परिसरात असल्याने या स्मृतिस्थळांचा विकास पर्यटन म्हणून केला जाणार आहे. असे सांगतानाच उमाजी नाईक यांचे समाधी स्थान नगरपालिकेने विकसित करण्याचे जाहीर केले आहे. त्याच प्रमाणे स्मारकाच्या विकासासाठी आमदार फंडातून २५ लाख रुपयांची घोषणा करून त्यातून त्यांचा इतिहास चित्रांच्या माध्यमातून समाजासमोर आणला जाईल, असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
भिवडी (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३० व्या शासकीय जयंतीनिमित्त स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे, तहसीलदार रूपाली सरनोबत, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव, पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, गटविकास अधिकारी अमर माने, उमाजी नाईक यांचे वंशज रमण खोमणे आणि चंद्रकांत खोमणे, मोहन नाना मदने, सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच राहुल मोकाशी, रामदास धनवटे, विठ्ठल मोकाशी, साहेबराव जाधव, भैया खोमणे, बाळासाहेब भिंताडे, साधू दिघे, दिलीप वांढेकर, त्याच प्रमाणे राज्याच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
: भिवडी (ता. पुरंदर) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.
080921\img-20210907-wa0017.jpg
फोटो ओळ ; भिवडी ( ता. पुरंदर ) येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त स्मारकास अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.