शिवाजी ट्रेलचे वतीने दुर्गवाचन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:20 AM2021-02-06T04:20:15+5:302021-02-06T04:20:15+5:30
शिवाजी ट्रेलचे समन्वयक विनायक खोत, रमेश खरमाळे, विजय कोल्हे,राजेंद्र जुंद्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच ...
शिवाजी ट्रेलचे समन्वयक विनायक खोत, रमेश खरमाळे, विजय कोल्हे,राजेंद्र जुंद्रे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक शनिवारी शालेय विद्यार्थी, नागरिक यांना इतिहासविषयक जागृती करण्यासाठी जुन्नरी कट्टा या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून शिवनेरीचे दुर्गवाचन दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात किल्ले शिवनेरीची स्थापत्यशैलीच्या अभ्यासाबरोबरच प्राचीन, मुघलकालीन, मराठेकालीन, पेशवेकालीन तसेच ब्रिटिशकालीन इतीहासाची माहिती विनायक खोत यांनी उपस्थितांना दिली.
गिरिदुर्गाबरोबरच, जलदुर्ग, भुईकोट यांच्या प्रत्यक्ष भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे.
--
०५ जुन्नर शिवाजी ट्रेल
किल्ले शिवनेरीवर दुर्गवाचन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी, नागरिक, महिला यांना माहिती देताना शिवाजी ट्रेलचे समन्वयक विनायक खोत.