किल्ले तिकोना : तटबंदी राहिली अधांतरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:39 AM2018-07-11T03:39:46+5:302018-07-11T03:40:22+5:30

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे.

Forts Tikona: The walls remained closed | किल्ले तिकोना : तटबंदी राहिली अधांतरी

किल्ले तिकोना : तटबंदी राहिली अधांतरी

Next

कामशेत  - ऐतिहासिक महत्त्व असलेल्या किल्ले तिकोना म्हणजेच वितंडगडावरील एक बाजूच्या तटबंदीचा अर्धा भाग गेल्या काही वर्षांमध्ये थोड्याथोड्याप्रमाणात ढासळत आहे. सध्या ही तटबंदी अधांतरी असून, मोठ्या पावसात या तटबंदीची दुरवस्था होण्याची भीती दुर्गप्रेमी व दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या मावळ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यातच ही तटबंदी अचानक ढासळली तर तटबंदीच्या आत असलेल्या मोकळ्या जागेत असलेले पर्यटक तसेच किल्ला सर करणारे पर्यटक यांच्या जीवितास मोठी हानी पोहचण्याची भीती आहे.
त्रिकोणी आकारामुळे तिकोना असे नाव पडलेला तसेच प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात असलेला तिकोना (वितंडगड) किल्ला ऊन वारा पाऊस झेलत आजही पवन मावळात दिमाखात उभा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याच्या कातळात खोदलेली गडद लेणी आणि माथ्यावरील तळजाई लेणी, खोल्या व पाण्याच्या टाक्या प्राचीनतेची साक्ष देत आहेत. कचेरी, दारूगोळा कोठार, वितंडेश्वर मंदिर, कातळ खोदीव पायºया, लेणी व दरवाजे स्तंभ टाक्या युक्त असलेल्या किल्ले तिकोनास शिवकाळात वितंडगड म्हणून संबोधले जात. हा ऐतिहासिक वारसा सांगणारा किल्ले तिकोनाचे गेल्या काही वर्षांमध्ये बरीच पडझड झाली आहे.
तिकोनागडावरील बालेकिल्ल्या वर पाण्याचा जाण्याचा मार्ग, बुरूज अशी सर्व सोई युक्त तटबंदी आहे. गडाच्या डाव्या बाजूची तटबंदी काळाच्या ओघात ऊन, वारा, पाऊस व दुर्लक्षित राहिल्याने तीचे अस्तित्व आता राहिलेले नाही. परंतु उजव्या बाजूचा सुंदर बुरूज, तटबंदी अजूनही शाबूत आहे. ती गडाचे गडपण जपून आहे. मात्र या तटबंदीचा एक ३ ते ५ मीटर अंतराच्या तटबंदीचा खालील काही भाग बºयाच दिवसांपूर्वी ढासळला आहे. त्यामुळे तटबंदी अगदी अधांतरी राहिली असून, कोणत्याही क्षणी ढासळू शकते, अशी भीती दुर्गसंवर्धनाचे कार्य करणाºया गडप्रेमींकडून वर्तवली जात आहे. तटबंदीच्या आतील बाजूस उभ्या असलेल्या पर्यटकास हे माहीत नसल्याने धोका पोहोचू शकतो.

दुर्गप्रेमी : तातडीच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न

किल्ले तिकोनावर गेली अनेकवर्षे गड संवर्धनाचे कार्य करणाºया वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व पुणे येथील श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. या तटबंदीची तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून ते प्रयत्नशीलही आहेत. मात्र या तटबंदीस वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यात कायदेशीर परवानगी व मोठी आर्थिक अडचण येत आहेत.

Web Title: Forts Tikona: The walls remained closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.