मंदोशी मंदिरात चाळीस हजाराचे मुखवटे चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:01+5:302021-02-09T04:13:01+5:30

रविवार( दि. ७) सकाळी पुजारी गणपत विष्णू तळपे पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. ...

Forty thousand masks were stolen from Mandoshi temple | मंदोशी मंदिरात चाळीस हजाराचे मुखवटे चोरीस

मंदोशी मंदिरात चाळीस हजाराचे मुखवटे चोरीस

Next

रविवार( दि. ७) सकाळी पुजारी गणपत विष्णू तळपे पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. शनिवारी संध्याकाळी पूजा आटोपून मुख्य मूर्तीचे ४ चांदीचे मुखवटे व इतर लहान २७ पिंडीवरचे मुखवटे पुजारी तळपे यांनी नेहमीप्रमाणे देवा-यात ठेवले व दरवाजा बंद करून आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणेच ते दरवाजा उघडून पूजेसाठी देवा-यात मुखवटे आणण्यासाठी गेले असता जागेवर चारही मुखवटे नसल्याचे जाणवले, नंतर बाकीचे मुखवटे सुद्धा नसल्याने मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. पुजारी तळपे यांनी लागलीच चोरी झाल्याची माहिती गावकुसावर दिली. या वेळी पोलीस पाटील लक्ष्मण तळपे, सरपंच बबन गोडे व ग्रामस्थांनी मंदिराच्या आसपास मुखवटे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु मुखवटे सापडले नाहीत, त्यामुळे अज्ञात चोरांनी चोरी करत अंदाजे वीस हजाराचे चांदीचे मोठे व वीस हजाराचे लहान, असे चाळीस हजाराचे मुखवटे चोरल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मंदोशी येथील काळभैरवनाथ मंदिर.

Web Title: Forty thousand masks were stolen from Mandoshi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.