ग्रामीण भागात साडेचार हजार ऑक्सिजन बेड व ४५५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:09+5:302021-04-24T04:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या ...

Four and a half thousand oxygen beds and 455 ventilators available in rural areas | ग्रामीण भागात साडेचार हजार ऑक्सिजन बेड व ४५५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध

ग्रामीण भागात साडेचार हजार ऑक्सिजन बेड व ४५५ व्हेंटिलेटर्स उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकांना गावात, गावालगत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले असले तरी आजही रुग्णांना ऑक्सिजन बेड्‌स, व्हेंटिलेटर्स बेड्‌स उपलब्ध होताना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात आज अखेर एकूण ९ हजार ६८१ बेड्‌स उपलब्ध आहे. यात ऑक्सिजन बेड्‌सची संख्या तब्बल ४ हजार ४५१ एवढे तर व्हेंटिलेटर्स बेड्‌स ४५५ उपलब्ध आहेत.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्याच्या सुविधा खूपच कमी आहेत. परंतु कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खासगी संस्था, कंपन्यांची मदत घेऊन व्यवस्था निर्माण केली आहे. यामुळेच सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात कोविड केअर सेंटर उभे राहिले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात खासगी हाॅस्पिटल ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे.

------

तालुका ॲक्टिव्ह रुग्ण आतापर्यंत मृत्यू हाॅटस्पाॅट गावे

आंबेगाव १५३३ १४० ११

बारामती १४८३ ७३ १५

भोर ४५६ ७० ०२

दौंड १३३६ ९२ २२

हवेली ३०९१ ५०२ २७

इंदापूर १५८३ १०८ २४

जुन्नर १४८८ २३५ ३४

खेड १२७० १५८ १८

मावळ ८०८ १०९ ०४

मुळशी २१०० १५५ १३

पुरंदर ५८४ १०७ १३

शिरुर २६२० १८० २८

वेल्हा १७७ २४ ०२

एकूण १८५२९ १९५३ २१३

-----------

ऑक्सिजन बेडसाठी करावी लागते धावपळ

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटरची सुविधा चांगल्या प्रमाणात उपलब्ध असल्या, तरी रुग्ण गंभीर झाल्यानंतर ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर्स बेड्‌ससाठी रुग्णांच्या नातेवाईकांना खूप धावपळ करावी लागते. रुग्णसंख्येच्या तुलनेत ऑक्सिजन बेड्‌स व व्हेंटिलेटर्स बेड्‌सची संख्या खूपच कमी आहे. यामुळे रुग्ण गंभीर झाल्यानंतर थेट पिंपरी-चिंचवड अथवा पुणे शहराची वाट धरावी लागते.

---

ऑक्सिजन बेड्‌ससाठी ७५ किलोमीटरचा प्रवास

खेड तालुक्यातील आंबोली गावातील एका कुटुंबातील लोकांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाची रॅपिड टेस्ट केली. यात घरातील पती-पत्नी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना ४० किलोमीटरवर असलेल्या म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यातील एका रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर ऑक्सिजन बेड्‌ससाठी पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये म्हणजे ७५ किलोमीटर प्रवास करून दाखल करावे लागले.

-------

- जिल्ह्यात ग्रामीण भागातील एकूण बेड्‌स संख्या : ९ हजार ६८१

- ग्रामीण भागातील ऑक्सिजन बेड्‌स : ४४५१

- ग्रामीण भागातील व्हेंटिलेटर्स बेड्‌स : ४५५

(डमी बातमी आहे - थोरात सर मेल करतील)

Web Title: Four and a half thousand oxygen beds and 455 ventilators available in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.