वाडा आरोग्य केंद्रात साडेचार हजार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:12 AM2021-04-28T04:12:42+5:302021-04-28T04:12:42+5:30
आलेल्या नागरिकांचे सुरुवातीला त्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. परंतु रेंजचा प्रश्न उभा राहतो. या कामी शिक्षकांना मदत करावी लागते. ...
आलेल्या नागरिकांचे सुरुवातीला त्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागते. परंतु रेंजचा प्रश्न उभा राहतो. या कामी शिक्षकांना मदत करावी लागते. आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स, नर्स, शिक्षक, ग्रामस्थ शासकीय यंत्रणा यांच्या सहकार्याने लसीकरणाची प्रक्रिया पार पाडली जात आहे. वाडा गावातील ८ हजार नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही नागरिक जवळच्या दुसर्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून येतात. ४५ वयापासून पुढील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. चार ते सहा आठवड्यानंतर दुसरा डोस काही व्यक्तींना दिला आहे. अजूनही काही व्यक्ती लसीकरणासाठी पुढे येत नाही. त्याचा शोध घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी सरपंच रघुनाथ लांडगे, पोलीस पाटील दिपक पावडे, ग्रामसेवक मच्छिंद्र मस्के, ग्रामपंचायत सदस्य प्रयत्न करत आहेत.
--
२७वाडा : लसीकरणाच्या नोंदणीसाठी आलेले नागरीक