बुलेट गाड्या चोरणाऱ्या चौघेजण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:28+5:302021-09-18T04:12:28+5:30
पुणे : बुलेट चोरी करणाऱ्या बुलडाणा जिल्हयातील ‘बुलेट राजा गँगकडून चार बुलेट गाड्या फरासखाना पोलिसांनी जप्त केल्या ...
पुणे : बुलेट चोरी करणाऱ्या बुलडाणा जिल्हयातील ‘बुलेट राजा गँगकडून चार बुलेट गाड्या फरासखाना पोलिसांनी जप्त केल्या आहेत, त्यांच्यावर अकोला, औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येकी १ आणि शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत, तर बीड जिल्ह्यात १ बुलेट आणि स्विफ्ट कार चोरल्याचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
रामेश्वर सूर्यभान वाघ (वय २०, रा. पिंपळगाव, ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा), शुभम सुनील डोईफोडे (मु. जळगाव, पो. पिंपळगाव, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा), आकाश संटोष काकड (२०, रा. किनगाव राजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) आणि हर्षद भगवान गंगतीरे (३२, धुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, सचिन सरपाले, समीर माळवदकर आणि अभिनव चौधरी यांची टीम करून बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, बीड येथे दुचाकी गाड्यांचा आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केली. त्यानुसार आरोपींनी चार गाड्या काढून दिल्या. यापैकी काकड आणि गंगतीरे या दोघांना किनगाव राजा, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा येथे अटक केली. त्यावेळी बीड जिल्ह्यात आणखी गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील, मनोज अभंग, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबूब मोकाशी, सयाजी चव्हाण, वैभव स्वामी, सचिन सरपाले, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, मोहन दळवी, राकेश क्षीरसागर, ऋषिकेश दिघे यांच्या पथकाने ही कारवाई केली.