डिझेल चाेरी करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:09 AM2021-06-18T04:09:07+5:302021-06-18T04:09:07+5:30
लोणी काळभोर : दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी ४ टेम्पोच्या टाक्यांची झाकणे व लॉक कशानेतरी उचकटून ३ टेम्पोतील १५० लिटर व ...
लोणी काळभोर : दोन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी ४ टेम्पोच्या टाक्यांची झाकणे व लॉक कशानेतरी उचकटून ३ टेम्पोतील १५० लिटर व १ टेम्पोतील २२ लिटर असे एकूण १४ हजार ७९२ रुपयांचे १७२ लिटर डिझेल चोरी करून नेले असल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे घडली होती. या चोरी प्रकरणी ४ जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
योगेश नवनाथ गायकवाड (वय ३०, रा. गोकुळधाम कॉलनी, मांजरी), गणेश विठ्ठल जाधव (वय ४९, रा. कुलर बायोप्लॉटच्या बाजूस, भंडारी हाईट्स मुंढवा, ता. हवेली), सौरभ सुरेश जगताप ( वय १९, रा. मांजरी), गणेश शरगप्पा शेरे (वय २०, रा. लोणकरवस्ती) या चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ६ एप्रिलला झाली होती. याप्रकरणी भीमा भिल्लू राठोड (वय ३९, रा. कवडी माळवाडी, गुजरवस्ती, ता. हवेली) या टेम्पो चालकाने फिर्याद दिली होती.
चोरट्यांनी कसलाही पुरावा मागे न ठेवल्याने गुन्हा उघडकीस आणणे जिकिरीचे काम होते. बुधवारी (दि. १६) सहायक पोलीस राजू महानोर यांना बातमीदारामार्फत डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी एमआयटी कॉलेज जवळील रेल्वे पुलाजवळ थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसीखाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा कबूल केला.