दागिने चोरणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: February 21, 2017 03:04 AM2017-02-21T03:04:27+5:302017-02-21T03:04:27+5:30
लग्नसमारंभासाठी घरात ठेवलेले ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना
पुणे : लग्नसमारंभासाठी घरात ठेवलेले ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चौघांना अटक केली़
नरेशकुमार केसाराम चौधरी (वय ४०, रा. सुखसागरनगर), अंबिका भगतसिंग मिझार (वय ३९, रा. बिबवेवाडी), राधिका चक्र सोनार (वय ३४, रा. कोंढवा रोड) आणि रेशमुन्निसा रफिद सय्यद (वय ४३, रा. स्वारगेट) अशी त्यांची नावे आहेत.
याप्रकरणी दीपक उत्तमचंद जैन (वय ४७, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना १२ ते १६ फेबु्रवारी २०१७ दरम्यान जैन यांच्या राहत्या घरी घडली. जैन यांच्या आत्याचे मुलीचे लग्न असल्याने त्यांनी बँकेमधील ३७ लाख ८० हजार रुपये किमतीचे १.८९० किलो ग्रॅम वजनाचे दागिने काढून आणले होते व ते बेडरूममध्ये ठेवले होते. ते आरोपींनी चोरले.
पोलिसांनी आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांचे कोणी साथीदार आहेत का, तसेच त्यांनी या प्रकारचा आणखी कोणता गुन्हा केला आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.