चार कोटींचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:07 AM2018-11-01T03:07:57+5:302018-11-01T03:08:26+5:30

एफडीएची २ महिन्यांतील कारवाई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्रांना वेग

Four crore adulterated food seized | चार कोटींचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

चार कोटींचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त

googlenewsNext

- राहुल शिंदे

पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात दाखल होणाऱ्या भेसळयुक्त पदार्थांवर अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई करण्यात आली असून, दोन महिन्यांत विभागात ५७ धाडी टाकून सव्वाचार कोटी रुपयांहून अधिक किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. त्यात खाद्यतेल, दुग्धजन्य पदार्थ, हळद पावडर, तांदूळ व तांदळाचे पीठ आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच १ कोटी ४२ लाख रुपयांचा गुटखाही पकडला आहे.

एफडीएकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात विक्रीसाठी दाखल केल्या जाणाºया भेसळयुक्त पदार्थांवर लक्ष ठेवले जात आहे. दोन महिन्यांपासूनच एफडीएच्या पुणे विभागातील अन्नसुरक्षा अधिकाºयांनी विविध ठिकाणी धाडी टाकून सुमारे तीन कोटींचे खाद्यपदार्थ जप्त केले. दिवाळी सणानिमित्त बाजारातून हजारो किलो हळद पावडर, आटा, मैदा, बेसन आदी खाद्यपदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत ही कारवाई करण्यात आली.

गुटखाबंदी असूनही महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा अवैध मार्गाने दाखल होतो. मात्र, त्यातील काही गुटख्यावर एफडीएकडून कारवाई केली जाते. गेल्या दोन महिन्यांत एफडीएकडून १ कोटी ४२ लाख ५७ हजार ७७५ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. मात्र, गुटख्याबरोबरच अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणावर खव्यासारखा दिसणारा पदार्थ पुण्याच्या बाजारपेठांमध्ये आणला जातो.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
एफडीएचे सहआयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, ‘‘दिवाळीनिमित्ताने फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची खरेदी केली जाते. त्यात काही व्यापाºयांकडून कळत नकळत भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचते. त्यामुळे एफडीएकडून भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई केली जात असून, केवळ सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांतच १३ ठिकाणी धाडी टाकून १ लाख ७४ लाख हजार २९ हजार १६० रुपये किमतीचे लाख १ हजार ४८७ किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. तसेच, १२ लाख ८४ हजार ८०० रुपये किमतीची हळद पावडर जप्त केली आहे.

Web Title: Four crore adulterated food seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :FDAएफडीए