कारेगाव-रांजणगाव जिल्हा परिषद गटास चार कोटी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:19 AM2021-03-04T04:19:45+5:302021-03-04T04:19:45+5:30
या विकास निधीमध्ये सोनेसांगवी येथे ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्यासाठी ७ लाख, स्मशानभूमी सुधारणा करणे ३लाख, रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायत ...
या विकास निधीमध्ये सोनेसांगवी येथे ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करण्यासाठी ७ लाख, स्मशानभूमी सुधारणा करणे ३लाख, रांजणगाव गणपती येथे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधणे २० लाख, स्मशानभूमी सुधारणेसाठी ५ लाख, बाभुळसर खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण ७ लाख, दशक्रिया घाटावर शेड बांधणे ५ लाख, स्मशानभूमी जोड रस्ता तयार करणे ६ लाख, गणेगाव खालसा येथे दशक्रिया घाट सुधारणा करणे ५ लाख, कान्हुर मेसाई येथे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत बांधणे १५ लाख, स्मशानभूमी सुधारणा करणे ५ लाख, वरुडे शिंगाडवाडी येथे स्मशानभुमी सुधारणा करणे ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हा नियोजन निधी लेखाशीर्ष ३०-५४ व ५०-५४ योजनेअंतर्गत विशेष अनुदान मंजूर करण्यात आले असून यामध्ये वाघाळे शिंगाडवाडी धुमाळ बेंद जोड रस्ता करण्यासाठी २५ लाख, कान्हुरमेसाई ते मांदळवाडी लोणी रस्ता सुधारणा करणे ग्राम निधी ५० लाख, खंडाळे ते पिंपरी दुमाला रस्ता सुधारणा करणे २५ लाख, कान्हुरमेसाई येथील पुंडे लवण वस्ती रस्ता सुधारणा करणे ३०लाख, गणेगाव ते चिंचोली मोराची जोड रस्ता सुधारणा करणे ३०लाख, निमगाव भोगी येवले माथा रस्ता सुधारणा करणे २५ लाख, कोंढापुरी ते गणेगाव खालसा रस्ता सुधारणा करणे २५ लाख तसेच
कारेगाव रांजणगाव जि. प. गटांमध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विशेष अनुदान मंजूर खंडाळे खेडकर मळा येथे जि. प. प्राथमिक शाळा दुरुस्ती करणे ३ लाख, कोंढापुरी कवठे मळा येथे जि. प.प्राथमिक शाळा नवीन वर्ग खोली बांधकाम करणे ७ लाख ५० हजार, कान्हूरमेसाई पुंडे मळा येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम करणे निधी ८ लाख ५० हजार रु, पिंपळे खालसा येथे नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम करणे निधी ८ लाख ५० हजार रु ,कारेगाव रांजणगाव जि प गटामध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी रस्ते व गटार तसेच नागरी सुविधा अंतर्गत विशेष अनुदान मंजूर खंडाळे अंतर्गत रस्ता करणे ६ लाख, गणेगाव खालसा येथे अंतर्गत रस्ता तयार करणे ७ लाख, खंडाळे येथे कृष्ण मंदिर ते खंडोबा मळा गावांतर्गत रस्ता करणे १० लाख, पिंपळे खालसा येथे आप्पा धुमाळ वस्ती रस्ता तयार करणे निधी ४ लाख,कारेगाव येथे सार्वजनिक दिवाबत्ती बसविणे( हाय मास्ट दिवे) निधी ५ लाख, कारेगाव येथे विरंगुळा केंद्र निधी २५ लाख, कारेगाव येथे अंतर्गत रस्ता करणे १५ लाख, पिंपळे खालसा येथे अंतर्गत रस्ता तयार करणे निधी ७ लक्ष रु मंजूर करण्यात आले असून लवकरच या विकासकामांचे भूमिपूजन करून कामांना सुरुवात होईल असे स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले.