जिल्ह्यातील चार धरणे झाली फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:09 AM2021-07-24T04:09:17+5:302021-07-24T04:09:17+5:30

पुणे : पुणे जिल्ह्यातील कळमोडी, वडीवळे, आंध्रा आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याची चिंता ...

Four dams in the district were full | जिल्ह्यातील चार धरणे झाली फुल्ल

जिल्ह्यातील चार धरणे झाली फुल्ल

Next

पुणे : पुणे जिल्ह्यातील कळमोडी, वडीवळे, आंध्रा आणि खडकवासला धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर-उस्मानाबाद जिल्ह्याचा काही भागासाठी महत्त्वाचे असलेले उजनी धरण प्लस मध्ये आले असून ६.१२ टक्के भरले (३.२८ टीएमसी) आहे.

जिल्ह्यातील टेमघर धरण क्षेत्रात सवार्धिक १३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मुळशी धरण क्षेत्रात २४ तासांत १२८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर वरसगाव आणि पानशेत धरण क्षेत्रात प्रत्येकी ११८ मिलीमीटर आणि निरा देवघर धरण क्षेत्रात ११७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण क्षेत्रात ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. दुपारी १ वाजता ३४१२ क्यूसेसने खडकवासला धरणातून विसर्ग केलेला आहे. तर वडज, येडगाव, घोड आणि विसापूर धरण क्षेत्रात सवार्त कमी म्हणजे ० टक्के पावसाची नोंद आहे.

------------------

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्याची माहिती

धरण - प्रकल्प साठा - सध्याचे टीएमसी

खडकवासला १.९७ १.९७

वरसगाव १२.८२ ७.८७

पानशेत १०.६५ ७.६९

टेमघर ३.७१ १.८६

पवना ८.५१ ५.७९

कळमोडी १.५१ १.५१

चासकमान ७.५८ ४.४५

आंध्रा २.९२ २.९२

मुळशी १८.४७ ११.१०

नीरा देवघर ११.७३ ८.९४

वडीवळे १.०७ ०.९९

भाटघर २३.५० ११.२५

वडज १.१७ ०.५५

वीर ९.४१ ६.७०

उजनी ५३.५७ ६.१२

डिंभे १२.४९ ६.६६

भामा आसखेड ७.६७ ५.२२

कासारसाई ०.५७ ०.४८

येडगाव २.८० १.०२

घोड ५.४७ ०.८५

विसापूर ०.९० ०.०८

पिंपळगाव जोगे ३.८९ -०.८०

माणिकडोह १०.१७ २.७७

गुंजवणी ३.६९ २.६७

Web Title: Four dams in the district were full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.