Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 08:07 PM2021-05-04T20:07:48+5:302021-05-04T20:08:23+5:30

एक ते दीड दिवस पुरेल इतकाच साठा

Four days later, Pune received 30,000 vaccines | Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

Coronavirus vaccine चार दिवसांनंतर पुण्याला मिळाल्या ३० हजार लसी

Next

चार दिवसानंतर अखेर पुणे शहरामध्ये लसीकरण सुरू होणार आहे .मात्र साधारण एक दिवस पुरेल इतक्याच लसी शहराला मिळाल्या आहेत. यामुळे फक्त दुसऱ्या डोस द्यायचा आहे त्यांचे लसीकरण करण्याचा महापालिकेचा विचार सुरू आहे. 

पुणे शहरामध्ये लसी अभावी गेले चार दिवस लसीकरण बंद होतं. तब्बल चार दिवसानंतर आज महापालिकेला कोव्हिशिल्डच्या 20000 तर कोव्हॅसिन चे दहा हजार डोस मिळाले आहेत. त्यामुळे शहरात काफीर उद्या लसीकरण सुरू होणार आहे मात्र इतक्या कमी लसी मध्ये नेमकं कुणाचं लसीकरण करायचं हा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. 18 ते 44 वयोगटातल्या नागरिकांचे लसीकरण कमला नेहरू रूग्णालय व राजीव गांधी रुग्णालयात सुरू राहणार आहे. तर ४५ चा वरचा नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस असणाऱ्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबत नियोजन सुरू आहे. मात्र एकुण कमी लसी उपलब्ध झाल्याने हे पुढे लसीकरण कसं सुरू ठेवायचं हा प्रश्न महापालिकेसमोर आहे. 

Web Title: Four days later, Pune received 30,000 vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.