चार चारचाकी आणि 12 दुचाकी वापरुन ते करायचे घरफाेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 09:42 PM2019-03-29T21:42:28+5:302019-03-29T21:44:27+5:30
चाेरीचे वाहने वापरुन घरफाेडी करणाऱ्यांना वानवडी पाेलिसांनी अटक केली आहे.
पुणे : चाेरीचे वाहने वापरुन घरफाेडी करणाऱ्यांना वानवडी पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 14 लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाेलिसांनी आराेपींना अटक करुन एकूण 20 गुन्ह्यांची उकल केली आहे.
याप्रकरणी पाेलिसांनी अमरसिंग जगरसिंग टाक (वय 20, रा. हडपसर, मूळ कर्नाटक) याला अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 28 मार्च राेजी वानवडी पाेलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी रात्री पेट्राेलिंग करत असताना पाेलीस शिपायी शिरीष गाेसावी व पाेलीस शिपायी नासीर देशमुख यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत घरफाेडी करणारे दाेघेजण ग्रे रांगाच्या माेटरसायकलवरुन रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामध्ये आल्याचे कळाले. त्यांच्या गाडीला नंबर देखील नव्हता. ही खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांनी रामटेकडी इंडस्ट्रियल भागातील स्माशानभुमी जवळून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे असलेली डिओ ही दुचाकी ही चाेरीची हाेती. पाेलिसांनी आराेपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चाैकशी केली असता त्यांच्याकडून 20 गुन्ह्यांची उकल करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून चार चारचाकी आणि 12 दुचाकी गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या गाड्यांचा वापर करुन त्यांनी लाेणीकाळभाेर, बिबवेवाडी, काेंढवा, सहकारनगर भागातील साेसायट्यांमधील बंद फ्लॅट आणि दुकाने रात्रीच्या वेळी फाेडल्याचे समाेर आले आहे. तसेच आराेपी आणि विधीसंघर्षित बालकाकडून वानवडी, काेंढवा, हडपसर, स्वारगेट, चंदननगर, शिवाजीनगर, वारजे, लाेणी काळभाेर, यवत या परिसरातील 16 वाहने व चार घरफाेड्यांमधील मुद्देमाल असे एकूण 14 लाख 14 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आराेपींचा इतर सहकाऱ्यांचा पाेलीस साेध घेत आहेत.