जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला; चौघे गंभीर जखमी त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 11:22 AM2021-08-19T11:22:27+5:302021-08-19T11:23:01+5:30

खेड तालुक्याच्या सिद्धेगव्हाण येथील घटना ; तीन आरोपींना अटक

Four killed in a land dispute; Four were seriously injured and two are in critical condition | जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला; चौघे गंभीर जखमी त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक

जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला; चौघे गंभीर जखमी त्यात दोघांची प्रकृती चिंताजनक

googlenewsNext
ठळक मुद्देचार जणांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या सिद्धेगव्हाण येथे गायरान जागेच्या वादातून चौघांवर तलवारीने खुनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान या हल्ल्यात चंद्रकांत किसन पवार (वय ४२), प्रतीक चंद्रकांत पवार (वय १८), चैतन्य उर्फ सोन्या चंद्रकांत पवार (वय १६) व कमल चंद्रकांत पवार (वय ३९ सर्व रा. सिद्धेगव्हाण) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी प्रमोद उर्फे नामदेव संजय भैरवकर (वय २७), संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर (सर्व रा.सिद्धेगव्हाण ता.खेड) या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चाकणपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. सिद्धेगव्हाण येथे गायरान जागेत वास्तव्यास असलेल्या पवार आणि भैरवकर या दोन कुटुंबात जागेच्या हद्दीवरून वाद होता. या वादातून प्रमोद उर्फे नामदेव संजय भैरवकर, संजय एकनाथ भैरवकर, जयश्री संजय भैरवकर यांनी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पवार कुटुंबातील चार जणांवर धारदार तलवारीने खुनी हल्ला चढवला.

रात्रीच्या सुमारास झालेला आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी हलविण्यात आले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान चाकण पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घटनेचा पंचनामा करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केले असता पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा आदेश खेड न्यायालयाने सुनावला आहे. यापुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे करत आहेत.

Web Title: Four killed in a land dispute; Four were seriously injured and two are in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.