वीज दुर्घटनेतील मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:09 AM2021-05-23T04:09:26+5:302021-05-23T04:09:26+5:30
नसरापूर-चेलाडी येथे दोन मे रोजी सीमा अरुण हिलम (वय ११), अनिता सिकंदर मोरे (वय ९) आणि चांदणी प्रकाश जाधव ...
नसरापूर-चेलाडी येथे दोन मे रोजी सीमा अरुण हिलम (वय ११), अनिता सिकंदर मोरे (वय ९) आणि चांदणी प्रकाश जाधव (वय ९) या मुली घरापासून जवळ असलेल्या डोंगरालगत खेळत होत्या. त्यावेळी वीज अंगावर पडून सीमा आणि अनिता या दोघींचा मृत्यू झाला तर चांदणी ही जखमी झाली होती. भोर वेल्ह्याचे आमदार संग्राम थोपटे, भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, भोर तहसीलदार अजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, मंडलाधिकारी श्रीनिवास कंडेपल्ली, जालिंदर बरकडे, नसरापूरच्या सरपंच रोहिणी शेटे, उपसरपंच गणेश दळवी, खरेदी-विक्री संघाचे संचालक बाबू झोरे, ग्रा. पं. सदस्य नामदेव चव्हाण, दत्त दिगंबर वाहतूक संस्थेचे चेअरमन उत्तम थोपटे, सामाजिक कार्यकर्ते अनिल शेटे, शंकर शेटे, राजू वाल्हेकर आदी हिलम आणि मोरे कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
या दुर्घटनेनंतर नैसर्गिक आपत्ती साहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्याकरीता आमदार संग्राम थोपटे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या बाबतची मागणी करण्यात आली होती. त्याकरीता जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे दाखल झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनाच्या नियमांच्या आधीन राहून तातडीने आर्थिक मदत करावी, असा आदेश दिले होते त्यानुसार ही मदत मृत कुटुंबीयांच्या वारसांना तातडीने धनादेशाद्वारे आर्थिक मदत देण्यात आली.
२२ नसरापूर
दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीचा धनादेश देताना संग्राम थोपटे, राजेंद्र जाधव, अजित पाटील व इतर.