चार लाखांचा मुद्देमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:50+5:302021-03-30T04:07:50+5:30

लासुर्णे: वालचंदनगर पोलिसांनी चार लाख पंधरा हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल तक्रार निवारणदिनी मूळ मालकाच्या ताब्यात दिला. ...

Four lakh issue | चार लाखांचा मुद्देमाल

चार लाखांचा मुद्देमाल

Next

लासुर्णे: वालचंदनगर पोलिसांनी चार लाख पंधरा हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल तक्रार निवारणदिनी मूळ मालकाच्या ताब्यात दिला.

येथील वालचंदनगर पोलीस स्टेशनला दर शनिवारी तक्रार निवारण दिन असतो. यादिवशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे वरिष्ठ अर्ज, रयत अर्ज , अदखलपात्र अहवाल यामधील अर्जदार व गैरअर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांचे तक्रारीचे निवारण करीत असतात. आज (दि.२७) रोजी तक्रार निवारण दिनाचे अनुषंगाने गुन्हा रजिस्टर क्रमाक ५१८/२०२१ मधील फिर्यादी यांना त्यांचा चोरीस गेलेला ३,३७,०८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांचे ताब्यात देऊन वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गहाळ झालेले ८१,५०० रुपये किंमतीचे मोबाईल हे तक्रारदार सुयश चौधरी, बाळु सर्वगोड, अक्षय पवार, संभाजी बडे, प्रशांत खारतोडे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे. यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, अतुल खंदारे, तावरे, मोहन ठोंबरे, बनसोडे, मोहिते यांचे पथकाचा या कारवाईत सहभाग होता.

वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुन्ह्यातील मुद्देमाल परत करताना दिलीप पवार.

२९०३२०२१-बारामती-०२

Web Title: Four lakh issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.