गावठी दारूवाहतूक करणाऱ्या कारसह चार लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:31+5:302021-07-15T04:08:31+5:30
याप्रकरणी बाळासाहेब दळवी (वय ३७, रा. मलठण, ता. दौंड) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस ...
याप्रकरणी बाळासाहेब दळवी (वय ३७, रा. मलठण, ता. दौंड) याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे, दगडू विरकर यांचे पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना या गस्ती पथकास शिरापूर-दौंड रोडने एक कार ( नं. एमएच ४२ के ६५८८ ) ही कार संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने जाताना दिसली. त्यामुळे पोलिसांनी त्या गाडीचा पाठलाग करून दौंड येथील भीमनगर येथे या कारला अडवले कारचा चालक बाळासाहेब दळवी यास खाली उतरवून कारची तपासणी केली असता कारचे पाठीमागील डीकीमध्ये ट्रक टायरच्या दोन ट्यूबमध्ये लपविलेली १२० लिटर गावठी हातभट्टी दारू मिळून आली. तसेच सदर माल व कार असा एकूण किंमत रुपये चार लाख सहा हजारचा माल जप्त केलेला आहे. तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.
दौंड येथे स्विफ्ट कारमधून अवैध दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला.