अवसरीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ, चार पुरुष, तीन महिलांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:44 AM2017-10-24T01:44:21+5:302017-10-24T01:44:39+5:30
पाच घरांवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी चार पुरुष आणि तीन महिलांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. १५ तोळे सोने आणि ६० हजार रुपयांची रोकड, असा एकूण पाच लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अवसरी : पाच घरांवर सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी चार पुरुष आणि तीन महिलांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. १५ तोळे सोने आणि ६० हजार रुपयांची रोकड, असा एकूण पाच लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सुमारे ३ तास त्यांनी धुमाकूळ घातला. ही घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द-भोरवाडी येथे सोमवारी पहाटे घडली.
चोरटे सहा ते सात असावेत, असा अंदाज आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी भेट देऊन पाहणी केली आहे. शेतकरी रामदास लक्ष्मण शिंदे यांचे दोनदालनी घर आहे. पुढील खोलीमध्ये घरातील सर्व जण झोपले होते. मागील दरवाजा कटावणीने उचकटून दरोडेखोर आतमध्ये आले. त्या वेळी चोरट्यांचा आवाज ऐकून सोमनाथ शिंदे यांनी त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. सोमनाथच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याने सोमनाथ रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडला. त्यानंतर घरातील सुलक्षणा जाधव यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे मंगळसूत्र, सुनीता रामदास शिंदे यांचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, आशा लोखंडे यांचे ५ तोळ्यांचे मंगळसूत्र, सोमनाथ शिंदे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची चेन ओरबाडून घेतली. चोरटे दारू प्यायलेल्या अवस्थेत होते. आशा लोखंडे यांची ५० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. मराठी, हिंदी भाषेत दरोडेखोर देत होते. महिलांना दरोडेखोरांनी मारहाण केली. चोरटे पुढील दरवाजाने बाहेर पडले. तसेच घराचा वीजपुरवठा खंडित केला.
रामदास शिंदे यांच्या घरातून एकूण सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे या वेळी सांगण्यात आले.
दरोडा पडलेल्या रामदास शिंदे यांच्याजवळच अवघ्या ४०० ते ५०० फुटांवर असलेल्या मंदाबाई पिंगळे यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळविला. चोरटे घरात घुसत असताना मुलगा दीपक आणि त्यांच्या घरातील सदस्यांनी आतून दरवाजा दाबून धरला. त्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी दीपक यांनी लाकडी काठीने दरोडेखोरांच्या पायावर मारहाण केली. त्यानंतर दरोडेखोरांनी जोराचा प्रयत्न करून दरवाजा उघडला. त्या वेळी कॉटवर बसलेल्या मंदाबाई पिंगळे आणि त्यांचा
मुलगा दीपक तसेच कमलाबाई भोर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. प्रसंगावधान राखून घरात झोपलेल्या रविनाने भाऊ नीलेश एरंडे याला मोबाईलवरून चोरटे आल्याची माहिती दिली. जवळच राहत असलेल्या नीलेशने पळत येऊन एका दरोडेखोराला मारले. हा सर्व गोंधळ जवळच राहत असलेल्या निर्मला भोर यांनी ऐकला. त्या पळत आल्या. त्या वेळी दरोडेखोरांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावले आणि अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. त्या वेळी जाताना दरोडेखोरांनी घराच्या दिशेने दगडफेक केली.
मंदाबाई यशवंत पिंगळे (वय ४९) यांच्या डोक्यात १२ टाके पडले आहेत, तसेच त्यांचा मुलगा यशवंत पिंगळे यांच्या डोक्यात १० टाके पडले असून उजव्या हाताचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. कमलाबाई भोर (वय ७५) या वृद्धेला गंभीर जखमी झाल्या आहेत. सकाळी निर्मला भोर यांचे मंगळसूत्र जवळच सापडल्याचे सांगण्यात आले.
मुरबाड परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकारी असणारे बाबाजी रभाजी भोर यांचा बंद बंगला दरोडेखोरांनी फोडला.
बंगल्यात फारसे काही साहित्य नसल्याने चोरट्यांना काही मिळून आले नाही.
>मंगळसूत्र चोरले..
हरिश्चंद्र तुकाराम भोर यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून बॅटरी तसेच ८०० रुपये चोरून नेले आहेत.
राजकुमार सय्यद शहा यांच्या राहत्या घराचा दरवाजा वाजवून उघडल्यानंतर राजकुमार यांची पत्नी जैबुन आणि त्यांचा मुलगा सलमान यांना मारहाण करून गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले.
अमोल पोपट भोर यांचे बंद दाराच्या बाहेरील कडीकोयंडा उचकटून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील ६ हजार रुपये रोख, पितळी भांडी, साड्या असा एकूण १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.