दिल्लीतला पैसा गल्लीत खर्चण्यात पुण्यातले चारही खासदार अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 06:00 AM2019-04-10T06:00:00+5:302019-04-10T06:00:06+5:30

लोकसभेत १ हजार १९२ प्रश्न विचारुन देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सुप्रिया सुळे यांची सभागृहातील उपस्थितीही ९६ टक्के इतकी आहे़

Four MPs of Pune fail to spend money who coming from of Delhi | दिल्लीतला पैसा गल्लीत खर्चण्यात पुण्यातले चारही खासदार अपयशी

दिल्लीतला पैसा गल्लीत खर्चण्यात पुण्यातले चारही खासदार अपयशी

Next

विवेक भुसे
पुणे : संसदेतली उपस्थिती आणि प्रश्न विचारण्यात आघाडीवर असणारे पुणे जिल्ह्यातले खासदार विकास कामांसाठीचा खासदार निधी मतदारसंघात खर्च करण्याच्या बाबतीत मात्र अपयशी ठरले आहेत. देशभरातल्या खासदारांनी खर्च केलेल्या निधीची राष्ट्रीय सरासरीसुद्धा जिल्ह्यातल्या चारही खासदारांना गाठता आलेली नाही. 
प्रत्येक खासदाराला दरवर्षी पाच कोटी रुपयांचा विकास निधी मिळतो. देशातल्या खासदारांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षात या विकास निधीचा कसा व किती उपयोग केला, याचा अहवाल परिवर्तन संस्थेने केला आहे़. खासदार निधी खर्च करण्याची राष्ट्रीय सरासरी १८ कोटी २ लाख रुपये असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  
लोकसभेत १ हजार १९२ प्रश्न विचारुन देशात प्रथम क्रमांकावर असलेल्या सुप्रिया सुळे यांची सभागृहातील उपस्थितीही ९६ टक्के इतकी आहे़. एकदा राज्यसभेवर आणि दोनदा लोकसभेवर निवडून गेलेल्या बारामतीच्या अनुभवी खासदार सुळे विकास कामांसाठी खासदार निधी वापरण्यात खूपच कमी पडल्या आहेत़. सुळे यांनी पाच वर्षात मिळालेल्या २५ कोटींपैकी फक्त १२़६२ कोटी रुपयेच खर्च केले.अनिल शिरोळे यांचा मतदारसंघातील संपर्क कमी असल्याचे सांगितले जात होते़.त्यांची संसदेतील उपस्थिती मात्र ९३ टक्के होती़ पहिल्यांदाच खासदार झालेले भाजपाचे शिरोळे सुळेंपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात यशस्वी ठरले असले तरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा तो कमी आहे. शिरोळेंनी १६ कोटी १२ लाख रुपयांची कामे मतदारसंघात केली़.
 पहिल्यांदाच खासदार झालेल्या मावळातल्या श्रीरंग बारणे यांनी १५ कोटी १० लाख रुपये खासदार निधी पाच वर्षात खर्च केला़. सन २०१४ मध्ये खासदारकीची हॅटट्रीक केलेल्या शिरुर मतदारसंघातील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्ह्यातल्या अन्य तीन खासदारांच्या तुलनेत सर्वाधिक खासदार विकास निधीचा वापर केला. अर्थात तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी म्हणजेच १७ कोटी १५ लाख रुपये इतका आहे़ तुलनेने, अन्य राज्यातील काही खासदारांनी मंजूर २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी वापरला आहे. खासदार जर्नादन सिंग सिग्रीवाल यांनी वापरलेला ३१ कोटी ४५ लाख निधी देशातल्या सर्व खासदारांमध्ये जास्त आहे़ राज्यातही काहींनी २५ कोटीपर्यंतचा खासदार विकास निधीचा वापर केला गेला आहे. पुणे जिल्ह्यातल्या चारही खासदारांना मात्र किमान राष्ट्रीय सरासरी असलेल्या १८ कोटी २ लाख रुपयांपर्यंतही पोहचता आलेले नाही़. 
़़़़़़़
पाच वर्षात खासदारांनी वापरलेला खासदार विकास निधी (कोटी रुपये)
पुणे -      अनिल शिरोळे                       १६़१२
मावळ -    श्रीरंग बारणे                        १५़१०
शिरुर -     शिवाजीराव आढळराव         १७़१५
बारामती - सुप्रिया सुळे                         १२़६५     
 


 

Web Title: Four MPs of Pune fail to spend money who coming from of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.