पुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:30+5:302021-04-25T04:11:30+5:30

पुणे : मागील दोन आठवड्यांपासून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हा पुरवठा सुरळीत झालेला ...

Four oxygen tankers left for Pune by Air Force aircraft | पुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना

पुण्यासाठी ऑक्सिजनचे चार टँकर हवाई दलाच्या विमानाने रवाना

googlenewsNext

पुणे : मागील दोन आठवड्यांपासून पुण्यात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडू लागला आहे. प्रशासनाच्या प्रयत्नानंतरही हा पुरवठा सुरळीत झालेला नाही. ऑक्सिजनची ही कमतरता भरून काढण्याकरिता थेट भारतीय हवाई दलाच्या मदतीचा हात पुढे केला आहे. हवाई दलाच्या विमानाने ऑक्सिजनचे चार रिकामे टँकर गुजरातमधील जामनगर येथे रवाना झाले. या टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार असल्याची माहिती संरक्षण विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

देशभरातच लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. हा तुटवडा कमी करण्यासाठी हवाई दल प्रयत्न करीत आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वेचीही मदत घेण्यात येत आहे. परंतु, रस्ते आणि लोहमार्गाने ऑक्सिजन पोचण्यास उशीर लागत आहे. त्यामुळे हवाई दलाने मदतीचा हात पुढे केला आहे. कमी वेळात ऑक्सिजन पुरविण्यासाठी विमानाने वाहतुकीचा प्रयत्न केला जात आहे.

हवाई दलाचे सी-१७ विमान शनिवारी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावरून पुण्यात दाखल झाले. या विमानात दोन रिकामे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर चढविण्यात आले. पुणे विमानतळावरून हे विमान जामनगरला रवाना झाले. हे दोन टँकर जामनगरला पोचवून हे विमान पुन्हा पुण्यात आले. दुसरी फेरी करून आणखी दोन ऑक्सिजन टँकर जामनगरला पोहोचविण्यात आले.

Web Title: Four oxygen tankers left for Pune by Air Force aircraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.