15 वर्षाच्या ब्रेनडेड मुलाकडून चाैघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:15 PM2018-05-07T18:15:32+5:302018-05-07T18:15:32+5:30
दुचाकीवरुन पडून जबर मार लागल्यामुळे एका 15 वर्षीय मुलाला ब्रेन डेड घाेषित करण्यात अाले. अवयवदानाबाबत त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केल्याने चार जणांना जीवनदान मिळाले अाहे.
पुणे : दुचाकीवरुन पडल्यामुळे ब्रेनडेड झालेल्या 15 वर्षीय तरुणाचे अवयव नातेवाईकांनी दान केल्याने चाैघांना जीवनदान मिळाले अाहे. तरुण मुलगा गमविल्याच्या दुःखातही नातेवाईकांनी अवयवदानाच्या घेतलेल्या निर्णयामुळे अाज चाैघांना नव्या अायुष्याची सुरुवात करता येणार अाहे.
दुचाकीवरुन ताेल जाऊन पडल्यामुळे 15 वर्षीय तरुणाला 3 मे राेजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्यानंतर उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मेंदूला जबर मार बसल्याने त्याला 5 मे राेजी ब्रेन डेड म्हणून घाेषित करण्यात अाले. ससून रुग्णालयाकडून त्याच्या नातेवाईकांचे अवयवदान करण्याबाबत समुपदेशन करण्यात अाले. दुःखाचा डाेंगर काेसळलेला असतानाही नातेवाईक अवयवदान करण्यास तयार झाले. या मुलाची एक किडनी ससून मधील प्रतीक्षा यादीनुसार एका 27 वर्षीय गरजू महिलेला दान करण्यात अाली. झाेनल ट्रान्सप्लांट काेअाॅर्डिनेशन कमिटीच्या प्रतीक्षा यादीनुसार दुसरी किडनी पुण्यातील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात अाली, तसेच यकृत नाशिकमधील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात अाले. तर हृद्य हे चेन्नईमधील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला देण्यात अाले. हे अवयव याेग्य वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पाेहचविण्यात वाहतूक शाखेच्या ग्रीन काॅरिडाॅरचे सहकार्य लाभले.
याविषयी बाेलताना ससून सर्वाेपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले म्हणाले, की गेल्या दीड वर्षात समाजात अवयव दानासंदर्भात जागरुकता निर्माण हाेत अाहे. अनेक नातेवाईक रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी तयार हाेत अाहेत ही उल्लेखनीय बाब अाहे. विशेषतः ससूनमध्ये अशा प्रकारच्या सुविधा वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली अत्यल्प दरात उपलब्ध हाेत असल्याने अनेकांना त्याचा फायदा हाेत असल्याचे दिसून येत अाहे. नजीकच्या काळात या रुग्णालयात अधिकाधिक प्रमाणात सुविधा देण्यासाठी ससून सुसज्ज हाेत अाहे.