भिगवण परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:42 PM2018-05-10T13:42:58+5:302018-05-10T13:42:58+5:30

भिगवण परिसरात दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला पलटी होऊन अपघात झाला. तर दुसरा अपघात हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या चारचाकीला घडला

Four people death in two separate accidents at Bhigavan area | भिगवण परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार 

भिगवण परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार 

googlenewsNext
ठळक मुद्देकार अपघातात विजापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.१०) पहाटेच्या सुमारास दोन त्यांच्या अंतराने भिगवणच्या परिसरातील डाळज नं.३ व लोणी देवकर गाव येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन सख्ख्या लहान बहिणींसह,दोन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा मृत्यु झाला असून तिघे जण जखमी झाले आहे.
गुरुवारी (दि.१० मे) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उमरग्याहून पुण्याकडे निघालेली ट्रॅव्हल्सची बस ऊसाच्या शेतात पलटी होवून अपघात झाला. त्यामध्ये चैताली दगडू सोनकांबळे (वय आठ वर्षे),ऋतिका दगडू कांबळे (वय पाच वर्षे, दोघी रा.आंबेडकर चौक,खडकी,पुणे) या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात एक जण जखमी झाला आहे.
दुसऱ्या अपघातात लोणी देवकर गावच्या हद्दीत पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारच्या अपघातात राकेश श्रीनिवास,माधव प्रसाद जहागीरदार (दोघे रा.सध्या विजापूर) हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मरण पावले. विनोद एस.मठ(वय २३वर्षे),सिध्दार्थ मजगी(वय २४ वर्षे,दोघे सध्या रा.विजापूर) हे जखमी झाले आहेत. हे सर्वजण विजापूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. जखमींवर इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी बाहेर हलवण्यात आले आहे.

Web Title: Four people death in two separate accidents at Bhigavan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.