भंगारमाफिया रशीद शेखसह चौघांना अटक
By Admin | Published: February 1, 2016 12:42 AM2016-02-01T00:42:40+5:302016-02-01T00:42:40+5:30
कंपनीमधील चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी चाकण येथील भंगारमाफिया रशीद शेख याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण : कंपनीमधील चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी चाकण येथील भंगारमाफिया रशीद शेख याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा भाऊ, साथीदार व कंपनीतील सुपरवायझर यांना चाकण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशीद छोटूमिया शेख, त्याचा भाऊ हाजीहारुण छोटूमिया शेख, साथीदार फिरोज शेख व महाळुंगे येथील सदगुरू इंजिनिअरिंग कंपनीमधील सुपरवायझर कैलास उत्तम कहाटे अशी आरोपींची नावे आहेत. कहाटेने आरईएमएल हब कंपनीमधील इतर जॉबची चोरी करून २२ हजारांचा चोरीचा माल फिरोज याच्यामार्फत रशीदला विकला होता.