दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून; खानवटे गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 12:49 PM2020-10-15T12:49:25+5:302020-10-15T12:57:27+5:30

दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर..

four people from the village were swept away in the flood waters at daund taluka | दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून; खानवटे गावावर शोककळा

दौंड तालुक्यात पुराच्या पाण्यात चार जण गेले वाहून; खानवटे गावावर शोककळा

Next
ठळक मुद्देराजेगाव येथील गोसावी ओढ्यातील घटना जिल्हा प्रशासनाकडून नदी, ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन या वाहून गेलेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्यापही सुरु

दौंड (राजेगाव): पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी पावसाने हाहाः कार माजवला. या मुसळधार पावसाने नदी, ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी, जिल्हा प्रशासनाकडून नदी, ओढ्याकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान,  पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात चार तरुण वाहून गेल्याची घटना दौंड तालुक्यातील राजेगाव येथे बुधवारी घडली. या वाहून गेलेल्यांपैकी तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून एकाचा शोध अद्यापही सुरु आहे. दुचाकीवरुन जात असताना ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेगाव (ता.दौंड.) परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे खानवटे (ता.दौंड) येथील दुचाकीवरून जाणारे चार नागरिक वाहुन गेले. त्यातील तीन व्यक्तींचे मृतदेह सापडले असून मृतांमध्ये पती पत्नींचा समावेश आहे. दुपारपर्यंत एकाचा  शोध घेण्याचे काम सुरु आहे.


          मृतांमध्ये शहाजी गंगाधर लोखंडे (वय ५२) आप्पा हरिबा धायतोंडे (वय ५५) आणि कलावती आप्पा धायतोंडे (वय ५०) यांचा समावेश आहे.  तर सुभाष नारायण लोंढे (वय ४८) यांचे शोधकार्य चालू आहे. 
आणि दुर्दैवी घटनेमुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकाला असलेल्या खानवटे गावावर शोककळा पसरली आहे. घटना स्थळी तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी भेट दिली. गावकामगार तलाठी जयंत भोसले यांनी स्थानिक ग्रामस्थांना घेऊन शोधकार्य केले.

Web Title: four people from the village were swept away in the flood waters at daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.