इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:31 PM2021-06-07T21:31:48+5:302021-06-07T21:31:59+5:30

गाडीचा टायर फुटल्याने झाला अपघात, अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचुर.

Four people were killed on the spot in a horrific accident involving two four-wheelers in Indapur | इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

इंदापूरात दोन चारचाकींच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार

googlenewsNext
ठळक मुद्दे गाडी पूणे लेनवरून डिव्हायडर तोडुन सोलापूर लेनवरून जाणार्‍या बोलेरो गाडीला जोरात धडकली

बाभुळगाव: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून एकमेकांच्या विरूद्ध दिशेने जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनांच्या विचित्र व भिषण अपघातात चारजण जागीच ठार झाले आहेत. इंदापूरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ घडली आहे.  हा अपघात इतका भीषण होता की अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. 

यामध्ये गणेश पोपटराव गोडसे, अविनाश कुंडलिक पवार व बाळासाहेब साळुंखे सर्व रा. सोलापूर अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर एकाचे अद्याप नाव समजू शकले नाही. ही घटना सोमवार ७ जूनला  दुपारी ३:३० च्या सुमारास पूणे सोलापूर हायवे रोड व्यवहारे पेट्रोल पंपानजिक घडली आहे. 

इरटीका गाडी सोलापूरहुन पुण्याकडे जात होती. तर बोलेरो ही गाडी पूण्याहुन सोलापूरकडे येत होती. इरटीका गाडीत एक ड्रायव्हर तर एकटाच तर बोलेरो गाडीत ड्रायव्हरसह तीघेजण बसले होते. इरटीका गाडी ही पूणे लेनवरून पूण्याकडे भरधाव वेगात जात असताना व्यवहारे पेट्रोल पंपानजिक तिचा टायर फुटला. गाडी पूणे लेनवरून डिव्हायडर तोडुन सोलापूर लेनवरून जाणार्‍या बोलेरो गाडीला जोरात धडकली. अशी माहिती मिळाली आहे.  

Web Title: Four people were killed on the spot in a horrific accident involving two four-wheelers in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.