खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

By admin | Published: October 5, 2015 01:59 AM2015-10-05T01:59:23+5:302015-10-05T01:59:23+5:30

पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

Four persons arrested in the killer attack | खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

खुनी हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक

Next

पुणे : पूर्वीच्या भांडणातील रागातून एकावर तलवार, लाकडी बॅट व स्टंपच्या सहाय्याने खुनी हल्ला करणाऱ्या चौघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मयूर बाळासाहेब चव्हाण (वय २६, रा. मंगळवार पेठ), शब्बीर ऊर्फ इम्रान तौफिक शेख (वय २२, रा. सोमवार पेठ) सागर भुजंग नायडू (वय १९, रा. मंगळवार पेठ) आणि गणेश नागेश कलकुटवार (वय २१, रा. मंगळवार पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विनायक अरुण कदम (वय ३५, रा. सोमवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कदम व आरोपी मयूर यांच्यात २००८ मध्ये भांडण झाले होते. त्यामध्ये कदम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पण त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली. याचा राग मनात धरून मयूरने इतर तीन आरोपींशी संगनमत करून कदम यांच्यावर शनिवारी रात्री आठ वाजता सोमवार पेठेतील क्रांतिवीर नानासाहेब पाटील चौकात हल्ला केला. यात कदम गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींनी त्यांना लाकडी बॅट व स्टंपने मारहाण केली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आले आहेत.
(प्रतिनिधी)
कमी भावात जमीन देण्याचे
आमिष दाखवून फसवणूक
पुणे : रत्नागिरी येथील शेतजमीन कमी भावात मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांची एकूण ५ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आनंद विश्वेश्वर जोशी (वय ४७, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) या आरोपीस अटक करण्यात आली आहे. रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वीरेंद्र विश्वनाथ देशपांडे (वय ६४, रा. रविवार पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील शैलेश शशिकुमार सावंत (रा. चिपळूण) हा आरोपी फरार आहे. मार्च २०१३ ते मार्च २०१५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीसह आणखी काही जणांची फसवणूक केली आहे. आरोपींनी रत्नागिरी जिल्ह्यातील तलसर येथील शेतजमीन कमी किमतीत विकत घेऊन देण्याचे आमिष फिर्यादींना दाखविले. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी धनादेशाद्वारे ५ लाख ६१ हजार रुपये घेतले. मात्र, कोणताही लेखी स्वरुपाचा करार न करता त्यांची फसवणूक केली.

Web Title: Four persons arrested in the killer attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.