वाहन कर्जप्रकरणी ‘रुपी’चे चौघे अटकेत
By admin | Published: August 12, 2016 01:12 AM2016-08-12T01:12:18+5:302016-08-12T01:12:18+5:30
बनावट कागदपत्रे सादर करून ६० लाखांचे कर्ज मिळवून देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या रुपी बँकेच्या विविध शाखांच्या ४ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.
पुणे : बनावट कागदपत्रे सादर करून ६० लाखांचे कर्ज मिळवून देऊन बँकेची फसवणूक करणाऱ्या रुपी बँकेच्या विविध शाखांच्या ४ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चौघांनाही १३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
प्रदीप जोशी (वय ५३, रा. वडगाव खुर्द), दत्ता पगारे (वय ५६, रा़ कोथरूड), महेंद्र दोशी (वय ५८, रा. सदाशिवपेठ) आणि प्रशांत गोरे (वय ५८, रा. सिंहगड रोड) अशी त्यांची नावे आहेत. यापूर्वी भाग्यश्री राहुल गोसावी (वय ३८, रा. शनिवारपेठ) हिला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भगवान बोत्रे (वय ४६, रा़ देहुगाव, ता. हवेली) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी राहुल गोसावी, विवेक ठोंबरे, विनय गोसावी, प्रज्ञा ठोंबरे, सचिन साळे, अजय कळसकर, मिलिंद शेट्टी, जयंत वाघ, श्रीधर बुद्धिकोट, एल. के. तिखे, एस. एन. जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला.