गुरुवारीही चार हजारांच्या पुढे नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:41+5:302021-04-02T04:11:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा सतत चार हजारांच्या पुढे असून, गुरूवारी शहरात नव्याने ...

Four thousand new patients on Thursday | गुरुवारीही चार हजारांच्या पुढे नवे रुग्ण

गुरुवारीही चार हजारांच्या पुढे नवे रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा सतत चार हजारांच्या पुढे असून, गुरूवारी शहरात नव्याने ४ हजार १०३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात तपासणीचा आकडा प्रथमच वीस हजाराच्या पुढे गेला असून, शहरातील विविध तपासणी केद्रांवर तब्बल २० हजार ६३१ संशयितांनी आपली तपासणी करून घेतली आहे़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही १९़८३ टक्के इतकी आहे़

शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही सातत्याने वाढत असून, आज दिवसभरात शहरातील ३५ जणांचा तर शहराबाहेरील परंतु पुण्यात उपचार घेणाऱ्या १४ अशा ४९ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी ही गुरूवारी १़९५ टक्के इतकी आहे़ परंतु, ही टक्केवारी जरी कमी दिसत असली तरी शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा दररोजचा आकडा तुलनेने वाढत चालला आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ३ हजार ४०३ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर ८२५ रुग्ण हे गंभीर आहेत़ आज दिवसभरात २ हजार ७७ कोरोनाबाधितही आज कोरोनामुक्त झाले आहेत़ वाढत्या रुग्ण संख्येमुळे व त्याप्रमाणात कोरोनामुक्त होणाºयांची संख्या कमी असल्याने, शहरातील सक्रिय रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहेत़ आज हा सक्रिय रुग्णांचा आकडा ३५ हजाराच्या पुढे गेला असून, सध्या शहरात ३५ हजार ८४९ सक्रिय रूग्ण आहेत़

शहरात आजपर्यंत १४ लाख ९९ हजार ७१४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ७३ हजार ४४६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ३२ हजार २६० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३३७ झाली आहे़

==========================

Web Title: Four thousand new patients on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.